एक्स्प्लोर

सांगलीत बनावट नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश, 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

सांगली पोलिसांनी (Sangli Police) मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकत, सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा (fake notes) जप्त केल्या आहेत.

Sangli Crime News : सांगली पोलिसांनी (Sangli Police) मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकत, सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा (fake notes) जप्त केल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या  50 रुपयांच्या बनावट नोटा बनवल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी मशिनरीसहीत 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी सांगली पोलिसांनी एकास अटक केली आहे. अहद महंमद अली शेख असे संशयीत आरोपीचं नाव आहे. 

कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

सांगलीतील मिरजमध्ये बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकास अटक केली आहे. अहद महंमद अली शेख असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली होती.

30 टक्के कमीशनवर या नोटा व्यवहारात आणण्यासाठी वापर

दरम्यान, पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनविणार्‍या कारखान्याचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे हा कारखाना मिरज शहर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावरच थाटण्यात आला होता. या  कारखान्यातून पोलिसांनी 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या 100 नोटांचे 38 बंडल जप्त केले. तसेच अहद शेख हा 20 आणि 10 रुपयांच्या देखील जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा बनवत असल्याचे समोर आलं आहे. या नोटा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले मशिन, कागद, लॅमीनेटर, नोटा कटींग करण्याठी वापरण्यात येणारे मशीन असे एकूण बनावट नोटांसह  3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहद शेख हा 30 टक्के कमीशनवर या नोटा व्यवहारात आणण्यासाठी अनेकांना देत होता. त्यामध्ये अहद शेख याला मदत केलीय. त्याने कोठे-कोठे बनावट नोटा व्यवहरात आणल्यात याचा देखील सांगली शहर पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या:

Fake Currency : नाशकात सलग दुसऱ्या दिवशी बनावट नोटा सापडल्याने खळबळ, मोठं रॅकेट उघड होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

व्हिडीओ

Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report
NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Embed widget