एक्स्प्लोर

कमिशन खाणाऱ्यांची फौज ते खंडणीखोरांचं राज्य अशी ओळख, व्हिजनलेस अर्थसंकल्प, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प व्हिजनलेस असल्याचं म्हटलं. राज्यात कमिशन खाणाऱ्यांची फौज असल्याचं ते म्हणाले.

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. महायुती सरकारचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. हा व्हिजन लेस अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं. 

राज्याची परिस्थितीची खूप हालाखीची आणि बिकट आहे. कर्ज आपण काढतोय पण कर्जाचे आकडे धोक्याच्या पातळीपर्यंत नाहीत, असं सरकार सांगतंय. परंतु, दरवर्षी कर्ज वाढत चाललंय, व्याज वाढत चाललंय, कर्जाचे हप्ते वाढत चालले आहेत. विकासकामं महत्त्वाची गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य सामाजिक सुरक्षा याकडे दुर्लक्ष होत चाललंय. पायाभूत सुविधांची दुसरी बाजू असते जी कुणाला लक्षात येत नाही, काँट्रॅक्ट देता येतात. कमिशन खाता येतं. कमिशन खाणाऱ्यांची फौज या सरकारनं निर्माण केली आहे. महाराष्ट्रात नवी गुंतवणूक येत नाही याचं कारण महाराष्ट्र खंडणीखोरांचं राज्य आहे, अशी ओळख निर्माण झाली आहे. हा अर्थसंकल्प व्हिजनलेस असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

खंडणीखोरांचं राज्य, कमिशन खाणाऱ्यांची फौज

पृथ्वीराज चव्हाण यांनी  राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असून शिक्षण आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं आहे. राज्यात कमिशन खाणाऱ्यांची फौज सरकारने निर्माण केल्याने महाराष्ट्र खंडणीखोरांचे राज्य आहे असे चित्र निर्माण झालंय. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक त्यामुळं येत नाही अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर  दिली.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील महायुती सरकारवर अर्थसंकल्पावरुन टीका केली. सरकारनं जो जाहीरनामा निवडणुकीत दिला होता त्याची पूर्तता बजेटमध्ये करण्यात आलेली नाही. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी गोलगोल आणि शेरोशायरीतच बजेट मांडलं. कुठून पैसे येणार कुठे खर्च होणार याचा उल्लेख नाही. संकल्पपत्रात 3 लाखाचे कर्ज माफ करण्याचं उल्लख झालेला नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं सागितलं त्याची फसवणूक करण्यात आलेली आहे, असं नाना पटोले म्हणाले. 

नाना पटोले पुढं म्हणाले की, अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीची कुठलीही घोषणा नाही. महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचं ठरवलं आहे.  हे फसवे सरकार असून महायुतीचा खरा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा राहणार ही भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले. राज्यावर 8 लाखाचं कर्ज आहे. आणखी महाराष्ट्राला कर्जबाजारी करण्याचं काम हे सरकार करतयं, असं  नाना पटोले म्हणाले.  

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीच्या आयातीबाबत सरकारचा मोठा निर्णय, सोन्याचे दर कमी होणार की वाढणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
सोन्या चांदीच्या आयातीबाबत सरकारचा मोठा निर्णय, सोन्याचे दर कमी होणार की वाढणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Petrol and Diesel Price: मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget