एक्स्प्लोर

पीठ आणि डाळींच्या किमती वाढणार? महागाईचा फटका बसणार? नेमकी परिस्थिती काय

पीठ (flour) आणि डाळींच्या (pulses) किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना महागाईचा (inflation) फटका बसू शकतो.

India Inflation : एकीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे (Rice Rate) भाव 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, स्थानिक पातळीवर पीठ (flour) आणि डाळींच्या (pulses) किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना महागाईचा (inflation) फटका बसू शकतो. गहू आणि डाळींचे घटलेले उत्पादन हे त्याचे प्रमुख कारण आहे. 

गहू आणि डाळींच्या पेरण्या पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत गव्हाच्या पेरणीत 5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दुसरीकडे डाळींच्या पेरणीत आठ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र, पावसानंतर ही कमतरता भरून काढता येईल, अशी सरकारला आशा आहे. तसे झाले नाही तर देशात पीठ आणि डाळीचे भाव वाढतील. त्यामुळे देशातील महागाई आणखी वाढेल. 

गव्हाची पेरणी कमी झाली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात गहू आणि डाळींच्या पेरणीत मोठी घट झाली आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरणीवर परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात गव्हाचा पेरा  5 टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी आतापर्यंत 141 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. तर गतवर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती.

यंदा डाळींच्या पेरणीत 8 टक्के घट

दुसरीकडे डाळींवरही महागाईचे संकट उभे ठाकले आहे. आकडेवारीनुसार, यंदा डाळींच्या पेरणीत 8 टक्के घट झाली आहे. आता देशात 940 लाख हेक्टरवर डाळींची पेरणी झाली आहे. तर गतवर्षी याच कालावधीत 103 लाख हेक्टरवर ही पेरणी झाली होती. म्हणजेच यंदा डाळींच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

वेळेवर पाऊस पडला नाहीतर किंमती वाढणार

आतापर्यंत दोन्ही पिकांसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. पाऊस पडताच ही टंचाई भरुन काढली जाईल, अशी सरकारला आशा आहे. परंतु तज्ञांवर विश्वास ठेवला तर त्याच्या अपेक्षा कमी आहेत. जर पेरणी वाढली नाही तर देशात डाळी आणि गहू किंवा मैदा आणि डाळीच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे देशात चलनवाढीचा दर वाढू शकतो. अलिकडच्या काही महिन्यांत देशातील जनतेला टोमॅटो आणि नंतर कांद्याच्या महागाईचा सामना करावा लागला. वेळेवर पाऊस पडला नाही आणि दोन्ही पिकांच्या पेरण्या वाढल्या नाहीत तर सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Bharat Dal : सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारची भेट! फक्त 60 रुपये किलोनं 'भारत डाळ'

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget