एक्स्प्लोर

सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर, मे महिन्यात किती टक्क्यांची वाढ?

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 7 टक्क्यांची वाढ झालीय. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. 

Gold Prices record News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Prices) विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. सर्वसमान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 7 टक्क्यांची वाढ झालीय. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. 

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात दर 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस 2,450 डॉलरची पातळी ओलांडली आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात यूएसच्या चलनवाढीच्या आकडेवारीनंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह आपल्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता वाढली आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की एप्रिलमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी होता. तसेच विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि चीनमधून येणारी प्रचंड भौतिक मागणी यामुळे किमतींना सातत्याने पाठबळ मिळत आहे. 

देशांतर्गत स्पॉट मार्केट

जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडच्या आधारे मंगळवारी देशांतर्गत स्पॉट  बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 24 कॅरेट (999) सोन्याचा भाव आज 839 रुपयांनी वधारुन 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवीन उच्चांक गाठला. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, किंमती सुमारे 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम (71,191 रुपये - 3 मे 2024) पर्यंत घसरल्या. अशाप्रकारे पाहिल्यास देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव मे महिन्याच्या नीचांकी पातळीपासून 4 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. यापूर्वी, 19 एप्रिल 2024 रोजी देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 24 कॅरेटने (999) वाढून 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका उच्चांक गाठला होता.

एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?

देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीने एमसीएक्सवर विक्रमी पातळी गाठली आहे. बेंचमार्क जून फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 74,442 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंमती सुमारे 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या (रु. 70,082 - 3 मे 2024). अशाप्रकारे पाहिले तर देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याचे भाव मे महिन्याच्या नीचांकी पातळीपासून ६ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. याआधी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर बेंचमार्क जून फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 12 एप्रिल 2024 रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढला होता.

महत्वाच्या बातम्या:

भारताच्या सोन्यापेक्षा दुबईचं सोनं स्वस्त, तुम्ही एकावेळी किती सोनं खरेदी करु शकता? सविस्तर माहिती एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
Embed widget