एक्स्प्लोर

नेमकी काय आहे PM विश्वकर्मा योजना? कोण घेऊ शकतो लाभ, अर्ज करण्याची पद्धत काय? 

PM Vishwakarma Yojana: प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana). प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी (ईओ) करतील.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार

PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे. 

सुतार
बोट किंवा नाव बनवणारे
लोहार
टाळे बनवणारे कारागीर
सोनार
कुंभार
शिल्पकार
मेस्त्री
मच्छिमार
टूल किट निर्माता
दगड फोडणारे मजूर
मोची कारागीर
टोपली, चटई, झाडू बनवणारे
बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
न्हावी
हार बनवणारे
धोबी
शिंपी

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक
वैध मोबाईल नंबर

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.
येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

महत्वाच्या बातम्या:

PM KISAN : एकाच घरातील वडील आणि मुलाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का? जाणून घ्या काय सांगतो नियम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget