एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कधी जमा होणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता? सविस्तर माहिती एका क्लिकवर

PM Kisan Yojana : आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PM Kisan Yojana : केंद्र सरकारनं (Central Govt) सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी विभागीय संकेतस्थळावर लक्ष ठेवावे लागणार आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते. 

18 वा हप्ता 5 ऑक्टोबर देण्यात आला होता

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळं शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.दरम्यान, 19 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी जारी केले जातात. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा

तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
'अपडेट मोबाइल नंबर' पर्याय निवडा.
शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.
यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.
अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात

PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
तुमचा तपशील एंटर करा, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.
तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.

PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज? 

सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा
विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा.
फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.

महत्वाच्या बातम्या:

डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार?

महत्त्वाच्या बातम्या

Dixon Tech : डिक्सन टेक्नॉलॉजीजची तैवानच्या जेमटेकसोबत मोठी भागीदारी; 'या' क्षेत्रात करणार एकत्र काम, शेअर तेजीत!
डिक्सन टेक्नॉलॉजीजची तैवानच्या जेमटेकसोबत मोठी भागीदारी; 'या' क्षेत्रात करणार एकत्र काम, शेअर तेजीत!
गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन
गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना दणका, व्याजदरात वाढ, गृहकर्ज आणि वाहन कर्ज अधिक महाग
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना दणका, व्याजदरात वाढ, गृहकर्ज आणि वाहन कर्ज अधिक महाग

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget