एक्स्प्लोर

कसा मिळवाल PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ? काय आहे प्रक्रिया? लवकरच जमा होणार 19 वा हप्ता

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांसाठी (Farmers) सर्वसामान्य लोकांसाठी सरकारनं (Govt) विविध योजना (Yojana) सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). आत्तापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे सरकार देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते. ते थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केली जाते. गेल्यावेळी त्याचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. आता 19व्या हप्त्याची वेळ जवळ आली आहे. 

कधी मिळणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. 

पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

यामध्ये New Farmer Registration वर क्लिक करा.

तुमचे सर्व तपशील बँक खात्याच्या माहितीसह भरा.

तुमच्या जमिनीच्या सर्व नोंदी भरा आणि OTP द्वारे पडताळणी करा.

तुमचा मोबाईल नंबर पीएम किसान योजनेशी कसा लिंक करायचा?

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

फार्मर्स कॉर्नर दिसेल, त्याखाली मोबाईल नंबर अपडेट करा वर क्लिक करा.

PM किसान योजनेच्या लाभाची माहिती कुठे मिळेल?

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

फार्मर्स कॉर्नर तेथे दिसेल, त्याखालील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका.

पेमेंट इतिहास आणि पात्रता तपासा.

तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा 

पीएम किसान सन्मान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.  म्हणजेच एका हप्त्यामध्ये  2000  रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून 19 व्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Unique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp MajhaKalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय संवाद : नव्या वर्षांत कसे करावे स्वत:मध्ये बदल? : 26 December 2024Anganwadi Sevika| लाडकी बहीणचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मानधन रखडलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Embed widget