एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? तारीख ठरली, केंद्राकडून मोठी अपडेट

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. 21 व्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

PM Kisan नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाद्दल नवी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या 20 हप्त्यांची  रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. केंद्र सरकारनं 24 फेब्रुवारी 2019 ला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जारी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत 20 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आली होती. 

PM Kisan 21 Installment : 18000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 19 नोव्हेंबरला योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवली जाणार आहे. त्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त राज्यांना अगोदरच देण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना पूरस्थितीतून सावरण्यासाठी पीएम किसानच्या हप्त्याची 21 व्या रक्कम देण्यात आली आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.70 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 20 हप्त्यांचे एकूण 40000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचे दोन हप्ते जारी करण्यामध्ये किमान चार महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. त्यानुसार 2 ऑगस्ट 2025 ला पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. तेव्हा 20500 कोटी रुपये 9.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवण्यात आले होते.


ई केवायसी करणं आवश्यक

शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत त्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत.  ई केवायसी सीएससी सेंटर वर जाऊन करता येईल. किंवा पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन देखील करता येईल. ओटीपी आधारित ई केवायसी आणि बायोमेट्रिक ई केवायसी, फेस आधारित ई केवायसी असे पर्याय उपलब्ध आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget