एक्स्प्लोर

नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक,कृषी योजनांच्या लाभासाठी फायेदशीर ठरणार

Farmer ID : पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मिळणारा लाभ सुरु ठेवायचा असल्यास फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे.

मुंबई :  पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी 6000 रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून चालवली जाते. तर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारकच्या कृषी विभागाकडून चालवली जाते. महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 च्या अर्थसंकल्पापासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना 6 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. या योजनेतून मिळणाऱ्या लाभाची रक्कम सुरु ठेवायची असेल तर शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढून घेणं आवश्यक आहे. जे शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत, त्यांना मिळणारा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळं तो सुरु राहण्यासाठी फार्मर आयडी काढणं आवश्यक आहे. 

फार्मर आयडीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?

फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनेक शेतकऱ्यांनी काढली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी आधार कार्ड, सात बारा उतारा गट क्रमांक, नमुना 8 अ खाते  उतारा क्रमांक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणं आवश्यक आहे. फार्मर आयडी नोंदणीसंदर्भात तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्र चालकांशी संपर्क करुन अधिक माहिती मिळवू शकता. 

नमो शेतकरी महासन्मान निधीतून किती रुपये मिळाले?

नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहा हप्त्यांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येकी 12 हजार रुपये मिळाले आहेत. पीएम किसानच्या 19 हप्त्यांचे 38000 रुपये धरल्यास शेतकऱ्यांना एकूण 50000 रुपये मिळाले आहेत.

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्प काय?

भारतात जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांक दिलेला आहे. त्याप्रमाणं अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाची रचना आहे. शेतकऱ्याचा एक यूनिक आयडी असेल. शेतकऱ्याची जिथं शेती असेल त्याचा फार्म आयडी असेल. शेतकऱ्याचा फार्मर आयडी आणि फार्म आयडीचं रेकॉर्ड तयार केलं जाईल. फार्मर आयडी आणि फार्म आयडी आधारशी लिंक केल्यानंतर पीक विमा आणि  पीक कर्ज या संदर्भातील मंजुरीची कामं डिजीटल पद्धतीनं पूर्ण होणार आहेत. या सुविधा अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढून घेतलेले नाहीत त्यांनी ते लवकर काढून घेणं आवश्यक आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget