एक्स्प्लोर

पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड

एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

Air India : एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. तक्रार आल्यानंतर डीजीसीए सक्रिय झाली असून, आता एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बोईंगचे B777 विमान उडवणाऱ्या पायलटने एअर इंडियावर लांब मार्गाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डीजीसीएने एअर इंडियाविरोधात चौकशी सुरु केली आहे.

पायलटची तक्रार, आरोपांची व्यापक चौकशी 

पायलटची तक्रार केल्यानंतर डीजीसीएने आरोपांची व्यापक चौकशी केली. त्यानंतर एअर इंडियाने नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. B777 च्या माजी पायलटने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माहिती दिली होती. एअर इंडियाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या B777 विमानासाठी ही तक्रार होती. आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठ्याच्या आवश्यक यंत्रणेशिवाय या विमानांमध्ये विमान कंपनी लांबचा प्रवास करते अशी तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने भाड्याने घेतलेल्या B777 विमानात रासायनिक ऑक्सिजन निर्मिती प्रणाली आहे. परंतू, ही सुमारे 12 मिनिटे टिकते. त्यामुळं सॅन फ्रान्सिस्कोला आणि तेथून एअरलाइनच्या थेट उड्डाणांमध्ये हे वापरले जात नाही. नुकतीच देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका कंपनीच्या फ्लाइटचे प्रवासी धावपट्टीवर आले आणि तिथेच जेवण करायला लागले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी

एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Flight Offers : फक्त 1799 रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर भन्नाट ऑफर

 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget