Flight Offers : फक्त 1799 रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर भन्नाट ऑफर
Air India Express Offers : एअर इंडियाने विमान प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये प्रवाशांना फक्त 1799 रुपयांमध्ये अनेक मार्गांवरील प्रवास करता येणार आहे.
Air India Flight Ticket Offers : विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) प्रवाशांसाठी खास मोहीम सुरू केली आहे. एअर इंडिया या मोहिमेचं नाव 'टाईम टू ट्रॅव्हल' (Time to Travel) असं आहे. या मोहिमेद्वारे प्रवाशांना विमान तिकीटावर खास सवलत देण्यात येणार आहे. आता प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानाने फक्त 1799 रुपयांमध्ये देशाच्या अनेक भागात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
एअर इंडियाची ही खास ऑफर वर्षभरासाठी सुरू करण्यात आली आहे. एअरलाइन्सची ही ऑफर 11 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीसाठी असणार आहे. या ऑफर अंतर्गत, प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत बेंगळुरू-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरा असा फक्त 1977 रुपयांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळत आहे.
Pack your bags, it's #TimeToTravel! ✈️ Unlock amazing journeys with fares starting at ₹1,799. 🌍✨ Book on https://t.co/rMBTOFB9H1 till 11 Jan 2024, and travel till 30 Sep 2024. Relax in our comfy seats, indulge in Gourmair hot meals, and experience unique Indian warmth! 🗓️ Book… pic.twitter.com/d1Q6O4ILOX
— Air India Express (@AirIndiaX) January 9, 2024
विस्तारा एअरलाइन्सकडूनही खास ऑफर
टाटा समूहाची एअरलाइन्स कंपनी विस्तारानेही आपल्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त विमान प्रवाशांसाठी विशेष सवलतीची घोषणा केली आहे. विस्ताराच्या या ऑफरनुसार अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवाशांना विशेष सवलतीचा लाभ मिळत आहे. विमान कंपनीने 9 जानेवारी 2015 पासून ही ऑफर सुरु केली आहे.
Fly within India aboard the cabin class of your choice, with our 9th #AnniversarySale to avail the special fares. One-way fares starting at INR 1809. Applicable for travel until 30-Sep-2024. Blackout dates apply.
— Vistara (@airvistara) January 10, 2024
T&C Apply.
Book now: https://t.co/IwYWzUqsf9
#VistaraTurns9 pic.twitter.com/X24Z2iUKtX
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशांतर्गत एअरलाइन्समध्ये प्रति तिकिट, तुम्हाला विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये 1809 रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये 2309 रुपये आणि बिझनेस क्लासमध्ये 9909 रुपये मोजावे लागतील. तर आंतरराष्ट्रीय टूरसाठी, इकॉनॉमी क्लासमध्ये 9999 रुपये, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 13,499 रुपये आणि बिझनेस क्लासमध्ये 29,999 रुपये मोजावे लागतील.