PIB Fact Check on Viral Message : सरकार तुम्हाला करणार 30 लाख रुपयांची मदत! जाणून घ्या व्हायरल मेसेजचे सत्य
PIB Fact Check on Viral Message : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार लोकांच्या खात्यात 30 लाख रुपये ट्रान्सफर करणार असल्याचा दावा केला जात आहे.
PIB Fact Check on Viral Message : देशात डिजिटलायझेशनची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे, अशातच सायबर क्राईमच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. इंटरनेटच्या माध्यामातून आजकाल सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार लोकांच्या खात्यात 30 लाख रुपये ट्रान्सफर करणार असल्याचा दावा केला जात आहे. हे पैसे सरकारी योजनेप्रमाणे लोकांच्या खात्यात जमा केले जातील. असंही या मेसेजमध्ये लिहलंय, पण खरंच ते पैसे लोकांना मिळणार का? काय आहे या मेसेजमागील सत्य? जाणून घ्या
'हा' मेसेज होतोय व्हायरल
व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, सरकारी योजनेद्वारे सरकार लोकांच्या खात्यात 30 लाख रुपये ट्रान्सफर करणार आहे. हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला 10,100 फी भरावी लागेल. व्हायरल मेसेजमध्ये एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यात असं लिहलंय की, ही रक्कम तुमच्या खात्यात तेव्हाच दिसेल, जेव्हा तुम्ही ही फी भराल.
A #Fake letter issued in the name of Govt of India claims that the recipient's account will be debited with Rs 30 Lakhs on payment of Rs 10,100.#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2022
Fraudsters impersonate Govt organisations to dupe people of money.
Beware of such fraudulent letters. pic.twitter.com/01ON2Z3cKI
काय आहे 'या' मेसेजमागील सत्य?
सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली आहे. हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे पीआयबीला fact check मध्ये आढळून आले आहे. केवळ पैसे उकळण्याच्या नावाखाली हा मेसेज व्हायरल केला जात आहे. यासोबतच पीआयबीने लोकांना या व्हायरल मेसेजपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :