फार्मा क्षेत्रातील 'या' कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
फार्मा क्षेत्रातील एका कंपनीनं (Pharma Company) गुंतवणूकदारांना (investors) मालामाल केलं आहे. ॲबॉट इंडिया (Abbott India) असं या फार्मा क्षेत्रातील मोठ्या कंपनीचं नाव आहे.
Abbott India News : फार्मा क्षेत्रातील एका कंपनीनं (Pharma Company) गुंतवणूकदारांना (investors) मालामाल केलं आहे. ॲबॉट इंडिया (Abbott India) असं या फार्मा क्षेत्रातील मोठ्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीला मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळं कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 410 रुपये लाभांश घोषित केला आहे. यामुळं गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला आहे.
ॲबॉट इंडियाला चौथ्या तिमाहीत 287 कोटींचा नफा
ॲबॉट इंडिया या फार्मा क्षेत्रातील मोठ्या कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. या कंपनीने गुंतवणूकदारांना बंपर भेट दिली आहे. कंपनीने 410 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. ॲबॉट इंडिया या फार्मा क्षेत्रातील मोठ्या कंपनीने चौथ्या तिमाहीत 287 कोटींचा नफा कमावला आहे. जो वार्षिक आधारावर मागील तिमाहीत 231 कोटींपेक्षा 56 कोटी अधिक आहे. त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्नही 1343 कोटी रुपयांवरून 1439 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळं कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा लाभांश जाहीर केलाय.
गुंतवणूकदारांना कधी मिळणार लाभांश?
ॲबॉट इंडिया कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्ससाठी 410 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 8 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे, ज्यामध्ये लाभांश मंजूर केला जाऊ शकतो. त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात 13 ऑगस्ट 2024 रोजी लाभांशाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. कंपनीची कमाई 7 टक्क्यांनी वाढून 1,439 कोटी रुपये झाली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते 1,343 कोटी रुपये होती. मिळालेल्या माहितीनुसार ॲबॉट इंडियाच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कंपनीच्या शेअर्समध्ये 3.21 टक्क्यांची वाढ नोंदवली जात असून ती 26,362.20 रुपयांवर आहे.
ॲबॉट इंडियाची स्थापना 1944
ॲबॉट इंडियाची स्थापना 1944 मध्ये झाली. Abbott India Limited ही सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आणि Abbott Laboratories USA ची उपकंपनी आहे. Abbott India चे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. कंपनी फार्मास्युटिकल औषधे बनवते आणि महिला आरोग्य, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, न्यूरोलॉजी, थायरॉईड, मधुमेह, यूरोलॉजी, वेदना व्यवस्थापन, जीवनसत्त्वे, अँटी-इन्फेक्टीव्ह आणि इतर थेरपी क्षेत्रे यासारख्या मजबूत ब्रँड इक्विटी अनेक उपचारात्मक श्रेणींचा आनंद घेते. ॲबॉट इंडियाचा वेर्ना, गोवा येथे अत्याधुनिक फॉर्म्युलेशन प्लांट आहे जो उच्च दर्जाची, उच्च व्हॉल्यूम फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. सध्या या कंपनीच्आ नफ्यात मोठी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: