खुशखबर! जुलै-ऑगस्टमध्ये मिळणार पीएफवरील व्याज, जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?
येत्या जुलै-ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांना पीएफवरील व्याज मिळणार आहे. 8.25 टक्के दराने हे व्याज मिळणार आहे. ते किती असेल हे जाणून घ्या.
EPF Interest rate: सध्या कर्मचाऱ्यांच्या इम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड (EPF) म्हणजेच पीएफ खात्यावरील जमा असलेल्या रकमेवर 8.25 टक्के व्याज मिळत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने (CBT) हा व्याजदर ठरवला आहे. केंद्र सरकारकडून या व्याजदाराला मंजुरीदेखील मिळाल आहे. आता कर्मचाऱ्यांना हे व्याज कधी खात्यावर जमा होणार, याची प्रतीक्षा आहे. 2023-24 या सालासाठी हा व्याजदर असेल. देशातील सवळपास सात कोटी कर्मचाऱ्यांना या व्याजदराचा लाभ मिळणार आहे.
नेमकं किती व्याज मिळणार? समजून घ्या
नव्या व्याजदरानुसार समजा तुमच्या ईपीएफ खात्यात 1 लाख 2023-24 सालासाठी 8,250 रुपये मिळतील. हीच रक्कम 3 लाख रुपये असेल तर व्याजाची रक्कम ही 24500 रुपये असेल. तुमच्या ईपीएफ खात्यावर 5 लाख रुपये जमा असतील तर 41250 रुपये व्याज मिळेल. EPFO च्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर हे व्याज जुलै-ऑगस्टपर्यंत मिळणार आहे. ईपीएफओने जमा असलेल्या पीएफवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-23 या वित्त वर्षासाठी हा व्याजदर 8.15 टक्के होता. आथा आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा व्याजदर 8.25 टक्के करण्यात आला आहे.
तुमच्या पगारातून पीएफ कसा कापला जातो?
EPFO च्या नियमानुसार कर्मचाऱ्याचा बेसिक-पे आणि DA यांच्या 12 टक्के हिस्सा PF खात्यात जमा केला जातो. एवढीच रक्कम (12 टक्के) कंपनीतर्फे पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीच्या 12 टक्के योगदानातील 3.67 टक्के रक्कम EPF खात्यात तर 8.33 रक्कम पेन्शन स्कीम (Pension Scheme) जमा केले जातात.
किती रुपये असल्यावर किती रक्कम मिळणार?
समजा तुमच्या ईपीएफ खात्यावर 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला 8.15 टक्के व्याजदराने 81,500 रुपये मिळाले अशते. पण आता व्याजदरात वाढ झालेली आहे. त्यामुळे 8.25 टक्के दराने 10 लाख रुपयांवर तुम्हाला 82,500 रुपये व्याज मिळेल. 0.10 व्याज वाढल्यामुळे तुम्हाला व्याजाच्या रुपात 1000 रुपये अतिरिक्त मिळतील. तुमच्या ईपीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर 41,250 रुपये व्याज मिळेल.
हेही वाचा :
34 व्या वर्षी अब्जाधीश झालेले निखील कामत संपत्ती दान करणार? वाचा मुलासंदर्भात त्यांचे विचार काय?
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
या आठवड्यात येणार 'हे' सहा आयपीओ, कमाईचा सिक्सर मारण्याची नामी संधी!