Petrol Diesel Price Today: दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली असताना आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Price Today 5th October 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. कच्च्चा तेलाच्या उत्पादनात घट केली जाणार असल्याची चर्चा आहे. उत्पादनात घट होण्याच्या चर्चेने क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू होती. आर्थिक मंदीची भीती आणि मागणीत घट झाल्याने ही घसरण झाली होती. मात्र, पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price Today) केले आहेत. दसऱ्याच्या दिवशीदेखील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 91.40 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, दुसरीकडे WTI क्रूड ऑईलचा दर 86.08 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. मागील 137 दिवसांपासून देशात इंधन दर स्थिर आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याने इंधन दर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. जुलै महिन्यात राज्य सरकारने कर कपात केली होती. त्यानंतर राज्यातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरात दर काय?
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
>> सीएनजी, पीएनजी गॅस दरवाढ
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजी गॅस दरवाढीची घोषणा केली. मंगळवारपासून ही दरवाढ लागू करण्यात आली. सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजी गॅसच्या दरात 4 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 86 रुपये इतकी झाली असून पीएनजी गॅसची किंमत 52 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. या दरवाढीने ऐण सणाच्या काळात ग्राहकांवर दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.