![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Petrol Diesel Price Today: ग्राहकांना दिलासा नाहीच, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
![Petrol Diesel Price Today: ग्राहकांना दिलासा नाहीच, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर Petrol Diesel Price know about today petrol diesel price today 20th November 2022 check latest fuel price Petrol Diesel Price Today: ग्राहकांना दिलासा नाहीच, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/45d23d9be9001e090bf9d9fa1299ad451668918661897290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. त्यानंतर काही दिवसांपासून पुन्हा एकदा घसरण सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे ग्राहकांना कोणताही दिलासा देण्यात आला नाही. देशातील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत.
तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक' ने मागील महिन्यात कच्च्या तेलाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली होती. चीनमधून कमी झालेली मागणी आणि आर्थिक मंदीचे सावट यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरू लागले होते. सप्टेंबर महिन्याच्या सुमारास कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरलच्या इतके झाले होते. त्यानंतर दरातील घसरण थांबवण्यासाठी तेल उत्पादनात नोव्हेंबर महिन्यापासून कपात केली. त्याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर वधारले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑईलचा दर 80.08 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा 87.62 डॉलर प्रति बॅरल इतका होता.
पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल
मागील पाच महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
देशातील प्रमुख शहरातील दर
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)