Petrol Diesel Price: दिलासादायक 204 दिवस! पेट्रोल, डिझेलचे दर आजही जैसे थेच
Petrol Diesel Price: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204वा दिवस आहे.
Petrol Diesel Price in 14 December 2022: महागाईच्या गर्तेत आजही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत घसरण होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
दरम्यान, तेल कंपन्यांनी बुधवारी (14 December 2022) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. अशाप्रकारे आज सलग 204 वा दिवस आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today : देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्याच दरानं उपलब्ध
भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांत बऱ्याच दिवसांपासून कोणताही नवा बदल झालेला नाही. शेवटचा मोठा बदल मे महिन्यात झाला. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारनं उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 8 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी डिझेलच्या दरांत प्रतिलिटर 6 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच दरांवर कायम आहेत.
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.