![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Petrol Diesel Price: मार्च एन्ड; महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कितीनं घटले?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
![Petrol Diesel Price: मार्च एन्ड; महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कितीनं घटले? Petrol and Diesel Price Today in India 31st March 2023 Petrol and Diesel Rate Today in mumbai Delhi Bangalore Chennai Hyderabad and More Cities Petrol Diesel price In Metro Cities Petrol Diesel Price: मार्च एन्ड; महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कितीनं घटले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/13/8f889f6a83d1c7b73e8baf3ee49f33371678714648614129_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आता कच्चं तेल प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास पोहोचलं आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 79.29 डॉलर आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.54 डॉलरच्या आसपास आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यामागे जगातील आर्थिक स्थैर्य आणि मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेत SVB आणि सिग्नेचर बँक बुडल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण झाली होती आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली पोहोचलं होतं.
कच्च्या तेलाच्या किमतींत सतत चढ-उतार होत असताना तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) जारी केल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. प्रमुख महानगरांमध्ये किमती जैसे थे आहेत.
आज देशातील महानगरांतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. आज देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील महानगरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)