Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाचे दर पुन्हा उसळले; पेट्रोल-डिझेलच्या किमतींत बदल झाला?
Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. सर्व महानगरांमध्ये वाहन इंधनाचे दर स्थिर आहेत.
Petrol-Diesel Price Today, April 30: पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांत आज म्हणजेच, 30 एप्रिललाही कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. आज कच्च्या तेलाच्या (Brent Crude Price) किमतीत वाढ झाली आहे. तो प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल पुन्हा एकदा प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेलं आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत असतानाही भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील अनेक भागात पेट्रोलच्या दरानं प्रतिलिटर 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर बहुतांश ठिकाणी डिझेलच्या दरानं प्रति लिटर 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, मे 2022 पासून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कायम आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com च्या नव्या अपडेट्सनुसार, आजही देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.
IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.
देशातील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती
- नवी दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर