एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार; पेट्रोल-डिझेलचे दरही बदलणार?

Petrol and Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले की, जसेच्या तसेच? जाणून घेऊया...

Petrol and Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे. WTI कच्च्या तेलात घट झाली आहे आणि ब्रेंट क्रूड तेलात वाढ झाली आहे. WTI कच्चं तेल 0.78 टक्क्यांनी घसरून 70.35 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट तेल 0.59 टक्क्यांनी वाढून 76.29 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी भारतातील सर्व शहरांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आजच्या दरांनुसार, अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर कमी झाले आहेत, तर काही ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मात्र, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

iocl नं जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget