एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: वर्षभरापासून पेट्रोल-डिझेल स्थिर; कच्च्या तेलाच्या किमतीही घटल्या

Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Rates Today: पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या वर्षभरापासून स्थिर आहेत. 22 मे 2022 पासून आजपर्यंत देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Rate) स्थिर आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीतही बदल दिसून आला. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले असले तरी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही कोणताही बदल झालेला नाही. 

कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत त्यांच्या किमतींतही घसरण दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75.64 डॉलरवर घसरली आहे. WTI चा दर देखील आज घसरला असून 71.60 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

देशात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये...

भारतात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जात आहे. इथे एक लिटर पेट्रोलची किंमत 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तसेच, महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.66 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये... 

IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.

महानगरांमध्ये पट्रोल-डिझेल स्थिर 

देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरांत काही प्रमाणात घटही नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर 

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
गुजरातच्या जामनगरमध्ये 'वाईल्डलाईफ अँड व्हेटर्नरी युनिव्हरसिर्टी' स्थापन होणार, अनंत अंबानींच्या वनताराचं पाऊल
गुजरातच्या जामनगरमध्ये 'वाईल्डलाईफ अँड व्हेटर्नरी युनिव्हरसिर्टी' स्थापन होणार, अनंत अंबानींच्या वनताराचं पाऊल

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime news Ambernath: नामांकित कंपनीतील महिलेचं बॉससोबत प्रेमप्रकरण, शेवटच्या भेटीत हॉटेलवर एकटीलाच सोडून गेला, तरुणीचं टोकाचं पाऊल
नामांकित कंपनीतील महिलेचं बॉससोबत प्रेमप्रकरण, शेवटच्या भेटीत हॉटेलवर एकटीलाच सोडून गेला, तरुणीचं टोकाचं पाऊल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
Embed widget