(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे दर
Petrol Diesel Price: देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता आहे, पण तरीही देशात गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.
Petrol Diesel Price Today: आजही पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतींबाबत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी. भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवार, 21 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशातील महानगरांत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून दरांत कोणतीही वाढ झालेली नाही. आज सलग 302वा दिवस आहे, जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
iocl ने जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).