Petrol-Diesel Price Today: मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
![Petrol-Diesel Price Today: मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय? Petrol and Diesel Price Today in India 01 March 2023 Petrol and Diesel Rate Today in mumbai Delhi Bangalore Chennai Hyderabad and More Cities Petrol Diesel price In Metro Cities Petrol-Diesel Price Today: मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/10/43a78cb939f45d8e5dd47483301a6d561676023900937636_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today : देशातील तेल कंपन्यांनी 1 मार्चसाठी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 मार्चलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या कित्येक महिन्यांपासून दर स्थिरच
दररोज सकाळी 6 वाजता देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल केले आहेत. 22 मेनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला नाही. आजच्या नव्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.
देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे एलपीजी सिलेंडर दरांतही वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai News) एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत.
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील महानगरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)