Investment Plan : तुम्हाला छोट्या बचतीसह गुंतवणूक सुरू करायचीय? 'या' योजना 'बेस्ट' पर्याय, चांगला परतावा आणि सुरक्षिततेची हमी
Small Savings Schemes : जर तुम्हाला छोट्या बचतीसह गुंतवणूक सुरू करायची असेल तर, काहा उत्तम पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा आणि सुरक्षिततेची हमी मिळेल.
Investment Plan : जर तुम्हाला छोट्या बचतीसह गुंतवणूक सुरू करायची असेल, तर बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त मोठ्या रकमेसह गुंतवणूक सुरू करता येते, असं मूळीच नाही. जर तुमचे बजेट कमी असेल तर, तुम्ही छोट्या बचतीतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. अनेक सरकारी लहान बचत योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यातून तुम्हाला चांगला परतावा मिळण्यासोबतच सुरक्षिततेची हमी देखील मिळेल. आवर्ती ठेव (Recurring Deposit), पीपीएफ (PPF), एनएससी (NSC), किसान विकास पत्र (KVP) यासारख्या अनेक बचत योजना आहेत. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनांमध्ये तुमचे खाते उघडू शकता आणि गुंतवणूक करू शकता.
कोणत्या योजनेवर किती परतावा मिळतो?
- पीपीएफ : 7.1 टक्के
- एससीएसएस : 8.2 टक्के
- सुकन्या योजना : 8.0 टक्के
- एनएससी : 7.7 टक्के
- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) : 7.4 टक्के
- किसान विकास पत्र : 7.5 टक्के
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा मुदत ठेव
- 1 वर्षासाठी : 6.9 टक्के
- 2 वर्षांसाठी : 7.0 टक्के
- 3 वर्षांसाठी : 7.0 टक्के
- 5 वर्षांसाठी : 7.5 टक्के
पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी आरडी : 6.7टक्के
सुरक्षित परतावा असलेल्या योजनेत गुंतवणूक करणे योग्य आहे. अल्पबचत योजनांमधून गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळू शकतो. यासोबतच PPF आणि SCSS सारख्या अनेक लहान बचत योजनांमध्ये तुम्ही आयकर सूट देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला 1.50 लाख रुपयापर्यंत लाभ मिळतो. या योजनांद्वारे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करु शकता. काही योजनांमध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता.
महिलांसाठी खास बचत योजना
भारत सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस 5 वर्षे आवर्ती ठेव (Post Office RD scheme) योजनेतील व्याजदर 6.5 टक्क्यांवरून 6.7 टक्के केला आहे. ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही महिलांसाठी एक विशेष योजना आहे . यावर 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
NPS Scheme : निवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचीय? दररोज फक्त 'एवढी' रक्कम जमा करा आणि टेन्शन फ्री व्हा