SIP Investment : मुलांना परदेशात शिक्षण देण्यासाठी किती रक्कम गुंतवावी लागेल? मुलं जन्मत:च सुरु करा गुंतवणूक
SIP Investment For Children Study : तुमच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं असेल तर, एसआयपी गुंतवणूकीचं नियोजन नेमकं कशाप्रकारे करावं लागे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
SIP Investment Plan For Children Study : सध्याच्या काळात प्रत्येकजण चांगल्या परताव्यासाठी चांगले गुंतवणूक पर्याय शोधण्यात व्यस्त आहे. काही जण शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवतात तर काही जण म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment Plan) करण्याला प्राधान्य देतात. अनेक जण आपल्या मुलांना परदेशात शिकण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. आपल्या मुलाने परदेशात जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी पालक अनेक प्रकारच्या फंडांमध्ये पैसेही गुंतवतात. सध्याच्या महागाईच्या काळात परदेशात शिक्षण घेण्यासाठी खूप खर्च येतो. यासाठी तुम्हाला जवळपास 50 ते 60 लाख रुपये मोजावे लागतात. अशा परिस्थितीत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवतात कोणता गुंतवणूक पर्याय चांगला आहे आणि कशामध्ये जास्त परतावा आणि फायदा आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला किती वर्ष लागतील?
योग्य गुंतवणूक करणे हा मुलांच्या भविष्यासाठी चांगला मार्ग असू शकतो. त्यासाठी तुम्ही मुलांच्या जन्मापासूनच गुंतणवणूक करण्यास सुरुवात केल्यास उत्तम आहे. 20 वर्षात निधी जमवण्यासाठी तुम्ही 50 लाख ते 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर, तुमच्या मुलांना परदेशातील चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. ट्यूशनची किंमत वेगवेगळ्या विद्यापीठांवर अवलंबून असते, पण जर तुम्ही आजपासून सर्वोत्तम एसआयपी सुरू केली तर, त्यामुळे तुम्हाला जास्तात जास्त परतावा मिळेल. याआधारे तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करु शकता.
एवढी रक्कम दरमहा गुंतवा
मुलांना परदेशात शिकवण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुरु करावी लागेल. यासाठी तुम्ही आजपासूनच 10,000 रुपये मासिक SIP सुरू केली, तर किती परतावा मिळेल जाणून घ्या. जर आपण बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीनुसार पाहिलं तर, म्युच्युअल फंडातून सरासरी 12 ते 15 टक्के परतावा मिळत आहे. अनेक फंड आहेत जे 20 ते 30 टक्के परतावा देतात. जर तुम्हाला सरासरी फक्त 15 टक्के परतावा मिळाला तर तुम्ही पुढील 20 वर्षांत 1 कोटी 51 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाचा जन्म होताच SIP करावी लागेल. म्हणजे जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी 20 वर्षांची होईल आणि त्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल, तेव्हा तुमच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असेल.