Rule Changes From 1 Feb 2024 : फेब्रुवारीमध्ये खिशाला झळ! पैशासंदर्भात NPS पासून फास्टॅगपर्यंतच्या 'या' 5 नियमात बदल
Money Rules Changes in Feb 2024 : 1 फेब्रुवारीपासून पैशासंदर्भातील काही नियमांत बदल होणार असून त्याचा थेट परिणाम खिशावर होणार आहे.
Rules Change From 1 Februay 2024 : नवीन वर्ष सुरु होऊन जानेवारी (January 2024) महिना संपायला आला आहे. जानेवारी महिन्याचे अवघे काही दिवस शिल्लक असून लवकरच फेब्रुवारी (February 2024) महिन्याला सुरुवात होत आहे. फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार असनून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशासंदर्भातील काही नियमांत बदल होणार असून त्याचा थेट परिणाम खिशावर होणार आहे.
NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम
1 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) खात्यातून (Account) पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. PFRDA ने NPS खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, आता NPS खातेधारक एकूण जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्केच काढू शकतील. यासोबतच हे पैसे काढण्यासाठी खाते 3 वर्षांपेक्षा जुने असावे.
IMPS नियमांमध्ये बदल
1 फेब्रुवारीपासून IMPS (Immediate Payment Service) च्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आता कोणतीही व्यक्ती कोणत्याही लाभार्थीचे नाव न जोडता 5 लाख रुपयांपर्यंत निधी हस्तांतरित करू शकते. यासाठी NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले होते. नियमांमध्ये बदल केल्यानंतर, आता तुम्ही खातेधारकाचा खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर जोडून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता.
SGB चा नवीन हप्ता
तुम्हाला सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल, चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेचा नव्या हफ्त्याला सुरुवात होत आहे. मच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तुम्ही 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत SGB 2023-24 मालिका IV मध्ये गुंतवणूक करू शकता.
फास्टॅगसाठी केवायसी अनिवार्य
NHAI ने फास्टॅगचे नियम बदलून KYC अनिवार्य केलं आहे. ज्या वाहनांचे फास्टॅगवर केवायसी पूर्ण झाले नाही, फास्टॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रिय केले जातील. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत फास्टॅग केवायसी पूर्ण करून घ्या.
स्टेट बँक गृहकर्ज
भारतीय स्टेट बँक ग्राहकांसाठी विशेष गृहकर्ज मोहीम राबवत आहे. या अंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर 65 bps ची विशेष सूट मिळत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रक्रिया शुल्कात सवलतीचाही लाभ मिळत आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत ग्राहक या विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :