search
×

EPFO कडून सात लाख रुपयांचा मोफत लाभ,' असा' करा अर्ज

EPFO : पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल.

FOLLOW US: 
Share:

EPFO : देशातील वाढत्या डिजिटायझेशनसोबतच EPFO ​​ने देखील आपल्या सर्व सुविधांचे डिजिटायझेशन केले आहे. EPFO आपल्या खातेदारांना सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ देते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. EPFO ​​खातेधारकांना 7 लाख रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. 

सात लाख रुपयांचा फायदा कसा मिळेल?
कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेअंतर्गत EPFO ​​प्रत्येक खातेदाराला सात लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. जर एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. तो EDLI विमा योजनेंतर्गत सहजपणे दावा करू शकतो. पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल. पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो.

EPFO ची ई-नॉमिनेशन सुविधा सर्व खातेदारांसाठी लागू आहे. ई-नॉमिनेशनचे संपूर्ण काम डिजिटल पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाण्याची देखील खातेधारकांना गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईपीएफओनं ई-नॉमिनेशन करण्याची संपूर्ण पद्धतही सांगितली आहे. यासाठी ईपीएफओकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून या नोटिफिकेनमधून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

ई-नामांकनाचे फायदे

  • ई-नामांकन केल्यानंतर तुम्हाला EPFO ​​कार्यालयात जाण्याची गरज नाही.
  • यानंतर तुम्हाला EDLI योजनेचा दावा करण्यासाठी कागदपत्रांची गरज भासणार नाही.
  • तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी बनवू शकता. 
  • गरजेनुसार नॉमिनी बदलले जाऊ शकतात
  • नॉमिनी खातेधारकाच्या मृत्यूनंतर, तुम्ही विम्याच्या पैशावर ऑनलाइन दावा करू शकता.

असं करा फाइल ई-नॉमिनेशन

  • फाइल ई-नॉमिनेशन करण्यासाठी खातेधारकाला प्रथम epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • यातील सर्व्हीस टॅबवर क्लिक करा आणि The employees ऑप्शनवर क्लिक करा.
     
  • यानंतर Member UAN/Online Service या ऑप्शनवर क्लिक करा.
     
  • पुढे e-Sewa Portal वर जाऊन सर्व आवश्यक माहिती नमूद करा
     
  • येथे तुम्हाला मॅनेजर टॅब दिसेल यात तुम्हाला YES पर्याय निवडावा लागेल आणि फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करावे लागेल.
  • आपल्या कुटुंबीयांची सर्व माहिती नमूद करा.
     
  • आता Nomination Details वर क्लिक करा आणि शेअरिंग टक्केवारीची माहिती भरा
     
  • यानंतर ईपीएफ नॉमिनेशन डिटेल्स save करायला विसरू नका.
     
  • E-Sign पर्याय निवडा आणि ओटीपी जनरेट करा
     
  • रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP नमूद करा.

भविष्याच्या सुरक्षेसाठी हक्काची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठी आर्थिक मदत करते. त्याचे देशभरात कोट्यवधी खातेदार आहेत जे गरज पडल्यास त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेले सर्व पैसे काढू शकता.

Published at : 16 Aug 2022 03:45 PM (IST) Tags: PF EPFO

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

Pune Wari Accident: विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत

Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन

आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ