search
×

LIC Scheme: पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर LIC भरणार प्रीमियम, जाणून घ्या प्लान

LIC Scheme: एलआयसीमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी समजली जाते. एलआयसीची 'जीवन लक्ष्य पॉलिसी' गुंतवणूकदारांच्या फायद्याची आहे.

FOLLOW US: 
Share:

LIC Scheme: विमा योजना अथवा गुंतवणुकीबाबत काही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने  (Life Insurance Corporation of India) एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा मिळू शकतो. 

एलआयसीकडून विविध विमा योजना सुरू आहेत. ग्राहकांना फायदेशीर ठरतील असे वेगवेगले प्लान आहेत. विमा क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे एलआयसीकडून देखील ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एलआयसीच्या 'जीवन लक्ष्य पॉलिसी'मध्ये (LIC Jeevan Lakshya Plan) चांगला परतावा मिळू शकतो. एलआयसीमधील गुंतवणूक (LIC Investment) ही सुरक्षित समजली जाते. जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतरही पॉलिसी मॅच्युअरिटी पूर्ण होते. यामध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कंपनीच प्रीमियमचा खर्च उचलते. तर, 10 टक्के हिस्सा हा Sum Assured च्या स्वरुपात दरवर्षी नॉमिनीला दिले जातात. 

पॉलिसी कोण घेऊ शकतो?

एलआयसी जीवन लक्ष्य योजना ही 13 ते 25 वर्षांच्या मुदतीसाठी आहे. या पॉलिसीत 18 ते 55 वर्षातील वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकते. पॉलिसी मॅच्युअर होण्याच्या कालावधीच्या तीन वर्ष आधीपर्यंत प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या कमाल 65 व्या वर्षापर्यंत पॉलिसी मॅच्युअर होऊ शकते. या योजनेत पॉलिसीधारकाला एक लाख रुपयांपर्यंतची Sum Assured रक्कम मिळते. या योजनेत तुम्ही दरमहा, तीन महिने, सहा महिने अथवा वार्षिक पद्धतीने प्रीमियम भरू शकता. 

डेथ बेनिफिट्स

या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा पॉलिसी मॅच्युअर होण्याआधीच मृत्यू झाल्यास एलआयसीकडून प्रीमियमचा खर्च उचलला जातो. पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत दरवर्षी Sum Assured चे 10 टक्के नॉमिनीला दिले जातात. पॉलिसी मॅच्युअरिटीनंतर सगळे पैसे नॉमिनीला दिले जातात. 

( Disclaimer: ही बातमी तुमच्या माहितीसाठी आहे. एखादी विमा योजना खरेदी करण्याआधी अथवा गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागार, जाणकारांचा सल्ला घ्यावा. )

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Published at : 25 Oct 2022 04:44 PM (IST) Tags: LIC Policy Investment tips Investment LIC

आणखी महत्वाच्या बातम्या

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली

ये रे ये रे पैसा... एका लाखाचे 3 कोटी; एका शेअरची कमाल, गुंतवणूकदारांची धम्माल!

ये रे ये रे पैसा... एका लाखाचे 3 कोटी; एका शेअरची कमाल, गुंतवणूकदारांची धम्माल!

ITR Return : आयकर परतावा भरण्यास सुरुवात, FY24 साठी कर प्रणाली बदलू शकता का? जाणून घ्या

ITR Return : आयकर परतावा भरण्यास सुरुवात, FY24 साठी कर प्रणाली बदलू शकता का? जाणून घ्या

Stock Market Updates : सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांकाची गुढी उभारली; 75 हजारचा टप्पा पार, निफ्टीही सुसाट

Stock Market Updates : सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांकाची गुढी उभारली; 75 हजारचा टप्पा पार, निफ्टीही सुसाट

टॉप न्यूज़

Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी

Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी

CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?

CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी

साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा

साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा