एक्स्प्लोर

Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन

जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर सुकन्या समृद्धी योजनेबद्दल जाणून घ्या, ही योजना मुलींना कोट्यधीश बनवणारी योजना आहे, जी त्यांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आली आहे.

Sukanya Samriddhi Yojana : घरात मुल जन्माला येताच त्याच्या पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता जाणवू लागते. अशातच मुलगी असेल तर तिचं शिक्षण, तिचं लग्न अशा अनेक जबाबदाऱ्यांच्या चिंतेनं मन व्याकूळ होतं. पण, जर पालकांनी वेळीच आर्थिक नियोजन केलं, तर त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक प्रश्न सुटतात. जर तुम्ही योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजन केलं, तर तुमची मुलगी मोठी झाल्यावर तिच्याकडे मोठी रक्कम असेल, जेणेकरुन ती मोठी झाल्यावर तिचं कोणतंही काम थांबणार नाही. मुलींचं भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सरकारनं सुकन्या समृद्धी योजना (Know About Sukanya Samriddhi Yojana) आणली आहे. ही सरकारी हमी योजना आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही योजना फक्त मुलींसाठी राबवली जाते. 

सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) तुम्ही वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. तुमच्या गुंतवणुकीनुसार कन्येसाठी भांडवल जमा होतं. सध्या या योजनेत 8.2 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. या दीर्घकालीन योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. ही योजना वयाच्या 21 व्या वर्षी मॅच्युअर होईल. जर तुमच्या मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडू शकता आणि वयाच्या 21 व्या वर्षी तिला 70 लाख रुपयांची मालकीन बनवू शकता. कसं ते जाणून घ्या सविस्तर...

21 व्या वर्षीय तुमची मुलगी बनेल 'लखपती'

तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला गुंतवणुकीसाठी दरमहा 12,500 रुपये वाचवावे लागतील. तुम्ही 15 वर्षांत एकूण 22,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे. 21 वर्षांच्या मुदतपूर्तीच्या वेळी, एकूण 46,77,578 रुपये व्याज म्हणून मिळतील. परिपक्वतेवर, मुलीला व्याज आणि गुंतवलेल्या रकमेसह एकूण  22,50,000 रुपये + 46,77,578 रुपये = 69,27,578 रुपये (सुमारे 70 लाख) मिळतील. ही रक्कम गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे. अशाप्रकारे, जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या नावावर या खात्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर वयाच्या 21 व्या वर्षी ती सुमारे 70 लाख रुपयांची मालकीन होईल.

जर वार्षिक 1 लाख गुंतवले तर... 

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी या योजनेत वार्षिक 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 8,334 रुपये गुंतवावे लागतील. अशा परिस्थितीत, 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 15,00,000 रुपये होईल. 21 वर्षांनंतर तुम्हाला रिटर्नमध्ये 31,18,385 रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 46,18,385 रुपये मिळतील.

यावर्षीपासून सुरुवात केली तर, पैसे कधी मिळणार? 

जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं 2024 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ही योजना 2045 मध्ये परिपक्व होईल, म्हणजेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे 2024 पर्यंत मिळतील. सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे, गुंतवणूकदार आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात. एसएसवाय खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येतं.

(वर देण्यात आलेली पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget