ITR Return : आयकर परतावा भरण्यास सुरुवात, FY24 साठी कर प्रणाली बदलू शकता का? जाणून घ्या
ITR Return Filling : जर तुम्ही कर प्रणाली निवडली असेल, पण आता तुम्ही कर प्रणाली बदलू इच्छित असाल, तर तुम्ही सहजपणे कर प्रणाली बदलू शकता.
Tax Regime 2024 : नव्या आर्थिक वर्षाला (New Financial Year) सुरुवात झाली असून कर भरण्याची (ITR Filling) वेळही सुरू झाली आहे. सर्व करदात्यांना 2023-24 या आर्थिक वर्षासाठी (Financial Year 2024-2025) आयटीआर (ITR) भरावे लागेल. मात्र, अद्यापही अनेक करदात्यांनी कर व्यवस्था निवडलेली नाही किंवा अनेक करदात्यांना त्यांची कर प्रणाली बदलायची आहे. तुम्हालाही हे करायचं असेल तर, तुमच्यासाठी संधी आहे. तुमच्याकडे कर प्रणाली निवडण्याची किंवा कर प्रणाली बदलण्याची अजूनही संधी आहे, यासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
आयकर परतावा भरण्यास सुरुवात ( ITR Filling Started )
नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून नव्या आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला कर भरताना नवी कर प्रणाली किंवा जुनी कर प्रणाली यातील एक निवडावी लागेल. जर तुम्ही कर भरताना कर प्रणाली निवडलेली नसेल, तर तुम्हाला थेट नवी कर प्रणाली लागू होईल. मात्र, तुम्हाला कर प्रणाली बदलायची असेल तर आताही तुम्ही कर व्यवस्था बदलता येईल.
कर प्रणाली कशी बदलावी? ( How to Change Tax Regime )
- जर तुम्ही कर व्यवस्था (Tax Regime) निवडली असेल, पण आता तुम्ही कर प्रणाली (New Tax Regime) बदलू इच्छित असाल, तर तुम्ही सहजपणे कर प्रणाली (Old Tax Regime) बदलू शकता.
- आयकर रिटर्न (ITR Filling) भरण्याचे सर्व फॉर्म (ITR Form) आयकर विभागाच्या (IT Department) वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- आयटीआर फॉर्ममध्ये (ITR Filling Form) कर प्रणाली निवडण्याचा पर्याय देखील आहे.
- ज्या करदात्यांनी अद्याप कर व्यवस्था म्हणजेच कर प्रणाली निवडली नसेल ते आयटीआर भरताना कर प्रणाली निवडू शकता.
- जर तुम्ही कर प्रणाली निवडली, तर तुम्हाला कलम 115BAC(6) अंतर्गत विचारलं जाईल की, तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत विवरणपत्र भरायच, आहे का? तुम्ही NO निवडल्यास कराची गणना जुन्या कर प्रणाली अंतर्गत केली जाईल.
- जर तुम्ही व्यवसायाच्या उत्पन्नाअंतर्गत रिटर्न भरले तर कर व्यवस्था बदलण्याचे नियम वेगळे आहेत. कर व्यवस्था बदलण्यासाठी ITR भरण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म 10-IEA भरावा लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :