एक्स्प्लोर

Income Tax: तुमच्या पत्नीला घरभाडे देऊन करात सूट मिळवू शकता, 'या' सहा गोष्टी फॉलो कराव्या लागतील

House Rent Allowance : जर तुम्ही तुमच्या पत्नीला घर भाडे दिले तर तुम्हाला HRA सूटचा लाभ मिळेल.या संदर्भात न्यायालयानेही निकाल दिला आहे.

मुंबई : कर कसा वाचवायचा, त्यातून जास्तीत जास्त सूट (Income Tax) कशी मिळवायची असे अनेक प्रकारचे प्रश्न सर्वसामान्यांना पडले असतात. सरकार करविषयक तरतुदींमध्ये वेगवेगळे बदल करत असते. घरभाडे (HRA) म्हणून भरलेल्या पैशावर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो. आता आणखी एका तरतुदीवरून तुम्ही तुमच्या करामधून सूट मिळवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीला घराचे भाडे देऊन कर सूट (House Rent Allowance) कशी मिळवू शकता. त्याचा फायदा कसा घेता येईल ते समजून घेऊ.

अंतरिम बजेटमध्ये कर मर्यादा वाढण्याची अपेक्षा आहे

अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर सूट मर्यादा वाढवून जनतेला काही दिलासा देण्याची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालय आयकर मर्यादा वाढवू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करदात्यांसाठी एचआरए (घर भाडे भत्ता) ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. घर कोणाच्या नावावर आहे याची पर्वा न करता तुम्ही त्यावर दावा करू शकता. घर तुमच्या पत्नीच्या नावावर असले तर तुम्ही HRA दावा करून कर सूट मिळवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीला घर भाडे देऊ शकता.

नवीन कररचनेत लाभ घेता येणार नाही

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन कर प्रणालीमध्ये HRA सूट मिळू शकत नाही. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला जुनी कर व्यवस्था निवडावी लागेल. HRA अंतर्गत सवलतीचे फायदे कसे मिळवायचे ते समजून घेऊ. यासाठी तुम्हाला सहा तरतुदी लक्षात ठेवाव्या लागतील.

अशा प्रकारे तुम्हाला फायदा होईल (House Rent Allowance)

1. सर्वप्रथम जर तुम्ही तुमच्या पत्नीला भाडे दिले तर तुम्ही HRA अंतर्गत लाभ घेऊ शकता.
2. अमन कुमार जैन केसमध्ये आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने पत्नीला भाडे दिले जाऊ शकते असे सांगितले होते. तसेच त्यावर कर सूटही मिळू शकते.
3. यासाठी पती-पत्नीमध्ये भाडे करार असावा. तसेच, पत्नीला घरभाड्याच्या पावत्या पतीला द्याव्या लागतील.
4. भाड्यातून मिळणारे पैसे पत्नीला तिच्या उत्पन्नात दाखवावे लागतील. इन्कम टॅक्स रिटर्नही भरावे लागणार आहे. भलेही त्याचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नसेल.
5. घराची मालकी पूर्णपणे पत्नीकडे असावी. तिच्या मालकीमध्ये नवऱ्याचा वाटा नसावा.
5. कर सूट मिळविण्यासाठी करदात्याला फॉर्म 12BB सोबत भाडे करार आणि पावत्या दाखवाव्या लागतील.
6. या पावत्यांमध्ये भाडेकरूचे नाव, घरमालकाचे नाव, भाड्याची रक्कम, घरमालकाची स्वाक्षरी आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKarveer Kolhapur Voting :  कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Embed widget