एक्स्प्लोर

ITR Filing: परतावा मिळाल्यानंतरही ITR मध्ये करू शकता बदल; सुधारीत ITR दाखल करण्याची मुदत कधीपर्यंत?

ITR Filing: आयकर विवरण दाखल केल्यानंतर तुमच्याकडून चुकून माहिती गेली असल्यास तुम्ही सुधारीत आयकर विवरण दाखल करू शकता. अगदी तुम्हाला आयकर परतावा मिळाला तरी सुधारीत ITR दाखल करू शकता.

Revised ITR Filing:  आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते. अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा करू शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे.

सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरा

आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काही बाबी जाहीर केल्या नाहीत अथवा चूक झाली आहे. तर, तो सुधारित आयकर विवरण दाखल करू शकतो. 

प्रोसेसिंग-रिफंड मिळाल्यानंतरही सुधारित आयकर रिटर्न भरण्यास मुभा

करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा जारी केला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.

31 डिसेंबरपर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 

सुधारित आयकर रिटर्न हे मूल्यांकन वर्ष संपण्‍याच्‍या पहिल्या तीन दिवसांच्‍या अगोदरपर्यंत दाखल केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, चालू मूल्यांकन वर्ष 2023-24 च्या बाबतीत, तुम्ही आयकर रिटर्न भरले आहे. ज्यामध्ये काही चूक झाली आहे, त्यानंतर 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही सुधारित आयटीआर दाखल करू शकता. उशीरा ITR दाखल करणारे करदातेदेखील सुधारित ITR देखील दाखल करू शकतात. 2019-20 पर्यंत, 31 मार्चपर्यंत सुधारित रिटर्न भरण्याची मुदत होती. त्यानंतर सरकारने तीन महिन्यांची मुदत कमी केली आणि ती 31 डिसेंबरपर्यंत केली. 

कमी परतावा मिळाल्यास काय करावे?

समजा तुम्ही आयटीआर दाखल केला आहे आणि तुम्ही दावा केला होता त्यापेक्षा तुम्हाला कमी कर परतावा मिळत असेल, तर तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत विभागाकडे अपील करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या करदात्याला फॉर्म 26AS मध्ये TDS क्रेडिट असूनही कमी कर परतावा मिळत असेल, तर तो आयकर कायद्याच्या कलम 154 अंतर्गत सुधारणा विनंती दाखल करून शिल्लक कर परतावा मागू शकतो. आयकर विभाग करदात्यांच्या विनंतीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना थकबाकी परतावा जारी करू शकतो.

इतर संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case: 'तू बीडची म्हणून सर्टिफिकेट देत नाहीस', महिला डॉक्टरवर कोणत्या खासदाराने दबाव टाकला?
Phaltan Doctor Case: 'PSI बदनेवर बलात्काराचा आरोप, निंबाळकरांनी धमकावलं का?'; प्रकरण तापलं
Satara Doctor Case : 'दोषींवर कठोर कारवाई होणार, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
Satara Doctor Case : 'पुरावा मिळाला तर सोडणार नाही', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा
Satara Doctor Case : '...राजकारण केलं जातंय', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी रणजित Nimbalkar यांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Embed widget