एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तुमच्या गरजांसाठी मालमत्तेच्या बदल्यात पुरवठादाराकडे योग्य कर्जाची निवड कशी करता येईल?

मालमत्तेवरील कर्ज, ज्याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी  म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये कर्जदार निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता किंवा मालकीची जमीन तारण म्हणून गहाण ठेवतो आणि त्यावर कर्ज घेतो.

Property Loan : आपत्कालीन परिस्थिती किंवा जीवनातील विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते, तेव्हा त्यांच्या समोरील एकमेव पर्याय म्हणजे एकतर मित्र किंवा कुटुंबियांना सांगून मदत मागणे अथवा सोन्यासारखी मालमत्ता म्हणजे रिअल इस्टेट विकणे. अशा पर्यायांचा विचार बहुतांशी लोक करतात. दोघांपैकी एकाची निवड करणं सोपं नाही. बहुतेक स्वाभिमानी लोकांना मदत मागायला आवडत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या घाम-रक्ताने उभी केलेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेणे देखील तितकाच कठीण असतो. 

सुदैवाने गेल्या काही वर्षांत, कर्जाचा पुरवठा करणाऱ्यांनी विविध प्रकारची कर्ज उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामुळे कर्जदारांना त्यांच्या मालमत्तेची मालकी न गमावता मोठी रक्कम उभी करणं शक्य होते. अशा प्रकारचे कर्ज म्हणजे मालमत्तेवरील कर्ज. मालमत्तेवरील कर्ज, ज्याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी  म्हणूनही ओळखले जाते. हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे. या प्रकारच्या कर्ज प्रस्तावाच्या बाबतीत, कर्जदार निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता किंवा मालकीची जमीन तारण म्हणून गहाण ठेवतो आणि त्यावर कर्ज घेतो. कर्जाची मुदत संपेपर्यंत किंवा कर्जदाराने कर्जाची पूर्ण परतफेड करेपर्यंत मालमत्तेची कागदपत्रे सावकार/ कर्ज पुरवठादाराकडे ठेवायची असतात. कर्जदाराने कर्जाची परतफेड केल्यानंतर, सावकार तारण ठेवलेल्या तारण (सिक्युरिटी)वरील सर्व अधिकार गमावतो आणि मालमत्तेची मालकी कर्जदाराकडे परत हस्तांतरित केली जाते.

मालमत्तेवरील कर्ज हा एक सुरक्षित कर्ज पर्याय आहे. तथापि, या कर्जांमध्ये जामीनदार (को-लॅटेरल) किंवा सुरक्षेपोटी तारण समाविष्ट आहे. तारण ठेवण्यात आलेली मालमत्ता ही तुम्ही तुमच्या मेहनतीने तयार केलेली असते. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवू शकता असा कर्जदार निवडणं महत्त्वाचे ठरते. आम्‍ही तुम्हाला काही तोडगे सांगतो, जे तुम्‍हाला तुमच्‍या मालमत्‍ता भागीदाराच्‍या बदल्यात योग्य कर्ज शोधण्‍यासाठी मदतीचे ठरतील.

तुमच्या गरजांसाठी मालमत्तेच्या बदल्यात पुरवठादाराकडे योग्य कर्जाची निवड कशी करता येईल

1. व्याज दरावर तडजोड करण्याची तयारी असणाऱ्याची निवड करा 

तुम्हाला देण्यात येणाऱ्या मालमत्ता कर्जाच्या व्याजदारावर तुमचा ईएमआय कितपत परवडणारा असेल आणि कर्जाची परतफेड करणे तुमच्यासाठी किती सोपी किंवा अवघड असेल हे ठरवेल. उच्च व्याजदर म्हणजे थेट उच्च ईएमआय असं समीकरण आहे आणि कर्जाची परतफेड हे ओझं बनू शकते. दुसरीकडे, कमी व्याजदरामुळे ईएमआय म्हणजे मासिक हफ्ता एखाद्याच्या बजेटमध्ये ठेवण्यास आणि कर्ज परतफेडीची प्रक्रिया सुलभ करण्यात मदतीचा ठरतो. 

कर्जदारांनी सखोल संशोधन केले पाहिजे. मालमत्तेच्या बदल्यात कर्ज ईएमआय कॅलक्यूलेटरचा वापर करून वेगवेगळ्या कर्ज पुरवठादारांच्या प्रस्तावाची तुलना करावी. सरतेशेवटी, त्यांनी अशा कर्ज पुरवठादाराकडे जावं, जो त्यांना व्याजदरांच्या बाबतीत सर्वात किफायतशीर सौद्याचा प्रस्ताव देईल. त्यामुळे कर्ज परतफेडीचा भार हलका होईल. पुढे, कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या कर्जदात्याशी वाटाघाटी करणे आवश्यक आहे आणि त्यांना अंतीम लागू व्याजदर शक्य तितका कमी करणे आवश्यक ठरते. 

आपल्याला मंजूर करण्यात आलेला व्याजदर हा वय, उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि तारणाची गुणवत्ता यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो हे कर्जदारांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे, कमी व्याजदराच्या व्यवहाराचा लाभ घेण्याची त्यांची शक्यता वाढवण्यासाठी, कर्जदारांनी किमान 750 क्रेडिट स्कोअर राखला पाहिजे. उच्च पुनर्विक्री मूल्यासह सह-जामीन (को-लॅटरल) तारण ठेवले पाहिजे आणि उत्पन्न तसेच नोकरीत स्थिरता राखली पाहिजे.

2. मालमत्तेच्या बदल्यात कर्जाचे प्रक्रिया आणि पुनर्परतावा शुल्क 

जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा त्यावर प्रक्रिया शुल्क समाविष्ट असते. मालमत्तेवरील कर्जाच्या बाबतीत, हे प्रक्रिया शुल्क कर्ज रकमेची टक्केवारी म्हणून आकारले जाते आणि सामान्यतः कर्ज रकमेच्या 1% ते 3% दरम्यान बदलते. तुम्हाला पैसे वाचवायचे असल्यास, प्रॉपर्टी प्रोसेसिंग फीसाठी सर्वात कमी कर्ज आकारणाऱ्या कर्ज पुरवठादाराची निवड करा किंवा या शुल्कासाठी वाटाघाटी करण्यास इच्छुक असलेली एखादी व्यक्ती निवडा. तुम्ही सणासुदीच्या काळात अर्ज केल्यास तुमचा कर्जदाता हा मालमत्ता कर्जापोटी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करू शकतो.

पुढे, जेव्हा लोक कर्जाचा लाभ घेतात, तेव्हा ते त्यांच्या एकूण व्याजाचा खर्च कमी करण्यासाठी आणि लवकर कर्जमुक्त होण्यासाठी वेळोवेळी प्रीपेमेंट करणे निवडतात. तथापि, प्रत्येक वेळी कर्जदार प्रीपेमेंटसाठी प्रीपेमेंट शुल्क आकारतात. ज्या कर्जदारांनी मालमत्तेवर फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतले आहे, ते कोणतेही शुल्क न भरता कधीही त्यांच्या कर्जाचा भाग भरू शकतात. कमी प्रक्रिया शुल्क आणि प्रीपेमेंट फी आकारणाऱ्या कर्जदात्याची निवड करा.  

3. प्रक्रिया कालावधी देखील महत्त्वाचा 

बहुतेक अर्जदार हे गरजेच्या वेळी मालमत्तेवरील कर्जासाठी अर्ज करतात. पालक या कर्ज पर्यायाचा लाभ घेतात. जेणेकरून मुलाला महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी मदत होईल किंवा त्यांनी नेहमी पाहिलेल्या लग्नाचं स्वप्न पूर्ण होईल. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची व्यवस्था म्हणून हा कर्ज पर्याय वापरतात. काहीवेळा, कर्जदार वैद्यकीय देयकं आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची काळजी घेण्यासाठी मालमत्तेवर कर्ज घेतात. बहुतेक लोक मालमत्तेवर कर्जासाठी अर्ज करतात, जेव्हा त्यांना तातडीने पैशांची गरज असते. तेव्हा प्रक्रिया कालावधी महत्त्वाचा ठरतो. त्वरीत कर्ज प्रक्रिया आणि कर्ज वितरणासाठी ओळखल्या जाणार्‍या कर्जदात्याची निवड करा.

4. तुमच्या कर्जदात्याचे पात्रता निकष फारसे कठोर नाहीत याची खातरजमा करा 

सर्व कर्जदात्यांकडे मालमत्तेवरील कर्जासाठी कठोर पात्रता निकष आहेत. या प्रकारच्या कर्जांतर्गत, कर्ज पुरवठादार हे मालमत्ता मूल्याच्या 60% पर्यंत कर्ज म्हणून मंजूर करतात. अशाप्रकारे, सुरळीत कर्ज प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला योग्य कर्जदार शोधायचा आहे. त्याचप्रमाणे कर्जदाते हे कर्जाची वेळेवर परतफेड करतील अशांना पैसे देतात. सर्व कर्जदात्यांचे कठोर पात्रता निकष आहेत. तथापि, कर्जदारांनी प्रयत्न करून कर्ज पात्रतेच्या आवश्यकतांबाबत फार कठोर नसणारे, एखाद्याला लवकर कर्ज मंजूर होण्यास मदत करणाऱ्या कर्जदात्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.  

5. सरतेशेवटी कर्ज रक्कम तपासा 

मालमत्तेवरील कर्जांतर्गत, कर्ज पुरवठादार हे मालमत्ता मूल्याच्या 50% ते 60% दरम्यान कर्ज मंजूर करू शकतात. तथापि, प्रत्येक कर्जदाते तुम्हाला आवश्यक ती कर्ज रक्कम देण्यास तयार नसतो. तुम्ही देऊ केलेल्या तारणाइतपत कर्जाची रक्कम नसण्याची शक्यता असते. एक कर्जदार म्हणून, तुम्ही शक्य तितक्या कर्ज पुरवठादारांशी बोलणे आवश्यक आहे. शेवटी, तुमच्या तारणावर सर्वाधिक कर्जाचा प्रस्ताव देणाऱ्या कर्जदात्याची निवड करा.

तुम्ही मालमत्तेच्या विरुद्ध कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व योग्य समस्यांचे निराकरण केल्यास तुम्हाला सर्वात आकर्षक दर मिळण्यास मदत होईलच, परंतु प्रक्रिया सुरळीत आणि विना-अडथळा पार पडेल.  


Disclaimer : हा लेख एक स्पॉन्सर्ड फिचर आहे. ABP किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार  किंवा उत्तरदायी असणार नाही. तसेच या लेखात सांगितलेली माहिती, घोषणा, पुष्टीकरण इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. त्यानुसार वाचकांना हा सल्ला दिला जातोय.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget