मुंबईत ऑगस्ट महिन्यात घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांची वाढ, तब्बल आठ हजार घरांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या महसुलात 74 टक्क्यांची वाढ
Real Estate : ऑगस्ट 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीत जवळपास 8 हजार 149 नव्या घरांची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी ऑगस्ट 2021 च्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली आहे. यातून राज्य सरकारला तब्बल 620 कोटी रूपयांचा महसूल मिळणार आहे.
मुंबई : बांधकाम व्यवसायिकांसाठी ऑगस्टचा महिना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खूपच चांगला गेलाय. ऑगस्ट 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीत जवळपास 8 हजार 149 नव्या घरांची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी ऑगस्ट 2021 च्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली आहे. यातून राज्य सरकारला तब्बल 620 कोटी रूपयांचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वार्षिक महसुलात 47 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या घर खरेदीसाठी 60 टक्के लोकांनी नोंदणी केली आहे. या महिन्यात ग्राहकांनी 500 ते 1000 स्क्वेअरच्या घरांना पसंती दर्शवली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाइट फ्रँक इंडियाने (Knight Frank India) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये ऑगस्ट 2021 च्या तुलनेत जवळपास 20 टक्के घर घरेदीत वाढ झाली आहे. देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे आरबीआयने मे 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत सलग तीन रेपो दरात 140 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्याचा परिणाम घर खरेदीवर देखील झाला आहे. जुलै 2022 मध्ये देखील घर खरेदीसाठी चांगला महिना ठरला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये नोंदणीत थोडीशी घट झाली आहे.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहाता ऑगस्ट महिना हा घर खरेदीसाठी तेवढा अनुकूल नसतो. परंतु ऑगस्ट 2022 या महिन्यात घर घरेदीत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांपैकी प्रत्येक ऑगस्ट महिन्यात घर खरेदीत घट झाली आहे. परंतु, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मात्र त्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली याहे. रेपो रेटच्या वाढीमुळे गृहकर्जाच्या दरांमध्ये वाढ झाली. शिवाय मुद्रांक शुल्कात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे.असे असूनही मुंबईतील घरांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.
नाइट फ्रँक इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये 10.412 घरांची नोंदणी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 10.172, मार्चमध्ये 17.728 एप्रिलमध्ये 10.136, मेमध्ये 5.360, जूनमध्ये 7.856, जुलैमध्ये 9.822, ऑगस्टमध्ये 6.784, सप्टेंबरमध्ये 7.804, ऑक्टोबरमध्ये 8.576, नोव्हेंबरमध्ये 7.582 आणि डिसेंबर 2021 मध्ये 9,681 घरांची नोंदणी झाली होती. तर जानेवारी2022 मध्ये 8.155 घरांची नोंदणी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 10.379, मार्चमध्ये 16.726 , एप्रिलमध्ये 11.743,
मे महिन्यात 9.839, जूनमध्ये 9.919, जुलैमध्ये 11.340 घरांची नोंदणी झाली. तर ऑगस्ट 2022 मध्ये 8,149 घरांची नोंदणी झाली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये 86 निवासी घर नोंदणी झाली. तर दहा टक्के व्यावसायिक, एक टक्के औद्योगिक, एक टक्के जमीनमध्ये आणि तीन टक्के नोंदणी ही इतर झाली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये नोंदणीकृत निवासी मालमत्तांपैकी निम्म्याहून अधिक घरे ही 500 ते 1,000 चौरस फूटापर्यंची आहेत. तर 1,000-2,000 चौरस फुटांच्या घरांचा 16 टक्के घरांची नोंदणी झाली आहे. याबरोबरच ऑगस्टमध्ये 2,000 चौरस फुटांपेक्षा जास्त घरांची फक्त दोन टक्के नोंदणी झाली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये नोंदणी झाल्याल्या घरांमध्ये पश्चिम उपनगरांमधील 57 टक्के ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. जुलै 2022 मध्ये पश्चिम उपनगरांत 56 टक्के घरांची नोंदणी झाली होती. जुलै 2022 च्या तुलनेत मध्य उपनगरांमधील खर खरेदीत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये मध्य उपनगरांमधील 35 टक्के घरांना पसंती धर्शवली. दक्षिण मुंबईत चार टक्के आणि मध्य मुंबईत केवळ तीन टक्के घरांना पसंती दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या