Aadhaar Card : सावधान! तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीच्या ठिकाणी तर होत नाहीय ना? लगेच चेक करा नाहीतर...
How to Avoid Aadhaar Card Misuse : तुमचं आधार कार्ड वापरुन भामटे कोणाला लुटत तर नाही आहे किंवा तुमचं आधारकार्ड नेमकं कुठे-कुठे वापरण्यात येत आहे. याची माहिती कशी घ्यावी, हे सविस्तर जाणून घ्या.
Aadhaar Card News : सध्या आपल्याला कोणत्याही कामासाठी आधार नंबर (Aadhaar Number) लागतो. सरकारी कामं असतील. सिमकार्ड (Sim Card) खरेदी करायचं असेल, लोन (Loan) घ्यायचं असेल किंवा फिरायला जायचं असेल या सगळ्या कामांसाठी आधार कार्डचा वापर होतो. आधार कार्ड नंबरवरुन त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. मात्र मागील काही महिन्यांपासून हेच आधारकार्ड वापरुन सायबर भामटे कोट्यावधी रुपये कमवताना दिसत आहे, काही दिवसांपूर्वी नवीन सिम चालवण्यासाठी इतरांचे आधार कार्ड वापरणारी टोळी पोलिसांनी शोधून काढली होती. एकाच फोटो आयडीसह तब्बल 658 सिमकार्ड देण्यात आले होते. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर प्रत्येकाने आपलं आधारकार्ड नीट आणि सुरक्षित आहे की नाही हे तपासलं पाहिजे.
आधार नंबर एकाचा आणि आधारकार्ड दुसऱ्याचं वापरुन अनेक लोक गुन्हेगारीत उतरताना दिसत आहे. त्यात चूकून तुमचं आधार कार्ड वापरुन भामटे कोणाला लुटत तर नाही आहे किंवा तुमचं आधारकार्ड नेमकं कुठे-कुठे वापरण्यात येत आहे. याची माहिती कशी घ्यावी, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालील स्टेप्स फॉलो करा आणि तुमचं आधारकार्ड कुठे वापरण्यात येत आहे ते पाहा.
खालील स्टेप्स फॉलो करा अन् आपलं आधारकार्ड सुरक्षित ठेवा...
- जेव्हा -जेव्हा तुमचं आधार व्हेरिफाइड केलं जातं, तेव्हा हिस्ट्री तयार होते. या हिस्ट्रीवरून तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे, हे शोधू शकता. ते ऑनलाईन कसे तपासावे ते जाणून घ्या.
- सर्वात आधी https://uidai.gov.in/ यूआयडीएआय (UIDAI) च्या संकेतस्थळावर जा. येथे तुम्हाला 'आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री'चा पर्याय दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. माय आधार (My Aadhaar) सेक्शनमध्ये तुम्हाला हा पर्याय दिसेल.
- याशिवाय या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history जाऊ शकता.
- यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) विचारला जाईल. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर सिक्युरिटी कॅप्चा टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.
- यानंतर आधारसोबत रजिस्टर केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
- ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचे आधार कार्ड केव्हा आणि कुठे वापरले गेले याची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल, मात्र हा रेकॉर्ड गेल्या सहा महिन्यांसाठीच उपलब्ध असेल.
- त्यासोबतच आपलं आधारकार्ड अपडेटदेखील ठेवायला हवं. येत्या 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचं आधारकार्ड फ्रीमध्ये अपडेट करु शकता. नाही तर त्यानंतर आधारकार्ड अपडेटसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :