(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिमेंटच्या किमती वाढल्यानंतरही मागणीत वाढ, 'हे' शेअर्स तुम्हाला देऊ शकतात मोठा नफा
Cement Price : अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, रामको सिमेंट आणि जेके सिमेंटच्या शेअर्सच्या किंमती आगामी काळात आणखी वाढू शकतात असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.
Cement Price : देशात आणि जगात वाढत्या मागणीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे या मागणीसोबतच सिमेंटचे भाव वाढले आहेत. अशीच स्थिती राहिल्यास सिमेंटचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या देशात सिमेंटच्या किंमती वाढलेल्या आहेत आणि मागणीदेखील वाढली आहे.
एका अहवालानुसार, मार्चमध्ये सिमेंट क्षेत्रात ज्या प्रकारे मजबूत रिकव्हरी झाली होती, ती एप्रिलमध्येही कायम राहिली. वार्षिक आधारावर एप्रिलमध्ये चांगली वाढ दिसून आली आणि अशा परिस्थितीत काही चांगल्या सिमेंट कंपन्या याचा फायदा घेण्याच्या स्थितीत आहेत. शेअर्सच्या बाबतीत अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, रामको सिमेंट आणि जेके सिमेंटच्या शेअर्सच्या किंमती आगामी काळात आणखी वाढू शकतात असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.
सिमेंटचे भाव वाढण्याची कारणं?
कोळसा आणि पेट कोक हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक सिमेंट उत्पादन उद्योगात कच्चा माल मणून वापरले जातात. कोळसा आणि पेट कोकच्या किमती अचानक वाढल्यामुळे सिमेंट उद्योगावर दोन प्रकारे परिणाम झाला आहे. कोळसा/पेट कोकच्या सतत वाढणाऱ्या किमतींव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलसारख्या पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढत आहेत. त्यामुळे कच्च्या मालाचा उत्पादन खर्च वाढत असून पॅकेजिंग साहित्यही महाग झाले आहे. त्याचबरोबर वाहतूक आणि वितरणाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे सिमेंट कंपन्या हा दबाव ग्राहकांवर टाकत असल्याचं कनोडिया सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कनोडिया यांचं म्हणणं आहे.
एप्रिलमध्ये पुनर्प्राप्ती
मार्च महिन्यातील सिमेंटच्या मागणीतील वसुली एप्रिलमध्येही सुरूच आहे. तर दरही वार्षिक आधारावर प्रति पोती 25 ते 30 रुपयांनी वाढला आहे. यासह एप्रिलमध्ये उद्योगाची वाढ कमी प्रमाणात पण दुहेरी अंकांमध्ये राहू शकते. पॅन इंडियाचा वापर एप्रिल पहिल्या दोन आठवड्यात 85 टक्क्यांवर गेला आहे. काही प्रदेशात 10 ते 15 रुपयांची कपात झाली असली तरी पुढे असे होणार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सिमेंटच्या किमतीत वाढ झाली होती. मार्चमध्ये त्या प्रमाणात काही कमी झाल्या, मात्र एप्रिलमध्ये पुन्हा कंपन्या दर वाढवत आहेत. यामुळे यूटीसीईएम आणि श्री सिमेंटसारख्या कंपन्यांना सर्वाधिक फायदा होईल. जेके सिमेंट आणि रॅमको सिमेंट्स देखील चांगला परतावा देऊ शकतात असं ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे.
कोणत्या स्टॉकवर आणि टार्गेट किंमतीवर काय मत
अल्ट्राटेक सिमेंट: खरेदी करा, रु.9080
श्री सिमेंट: खरेदी करा, रु.29700
जे के सिमेंट: खरेदी करा, रु. 3935
रामको सिमेंट्स: खरेदी करा, रु. 1035
दालमिया भारत: ADD, रु 2025
Nuvoco Vistas: खरेदी करा, रु 590
इंडिया सिमेंट्स: विक्री, रु. 157
जेके लक्ष्मी सिमेंट: खरेदी करा, रु 700
ओरिएंट सिमेंट: होल्ड, रु. 191
ग्रासिम इंडस्ट्रीज: होल्ड, रु. 1732
(टीप : स्टॉक गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही ABP माझाची वैयक्तिक मते नाहीत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घ्या.)