ऑनलाईन नोकरीच्या नावाखाली 60 कोटींची फसवणूक, पोलिसांनी दोन आरोपींना केलं अटक
ऑनलाइन नोकरी आणि घरून काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Online Job Fraud: ऑनलाइन नोकरी आणि घरून काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दोघांनाही घरुन सहज काम करुन लाखो रुपये कमावण्याचे आश्वासन होते. तसेच लोकांची फसवणूक करत होते. या गुंडांनी अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
तीन महिन्यांत आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांमध्ये 60 कोटींहून अधिकचे व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले. या खात्यांमधील 1.1 कोटी रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील गांधीनगर येथून रुपेश ठक्कर आणि पंकज भाई ओड नावाच्या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरलेले अनेक फोन आणि बँक खातीही जप्त करण्यात आली आहेत.
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने काही फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधल्याची तक्रार दाखल केली होती. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला घरी अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवले. त्याला एका टेलिग्राम चॅनेलमध्ये जोडण्यात आले. नंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना चांगल्या रिटर्नचे आश्वासन देऊन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. तो फसवणूक करणाऱ्यांना बळी पडला आणि त्यांच्या खात्यात 2.45 लाख रुपये जमा केले. नंतर काम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
बँक खात्याच्या मदतीने आरोपींचा शोध
माटुंगा पोलीस ठाण्याने कारवाई करत विद्यार्थ्याने कोणत्या बँक खात्यात पैसे जमा केले होते, याचा मागोवा घेतला. त्यानंतर या खात्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. आरोपींची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक गांधीनगर, गुजरात येथे पोहोचले आणि तेथून रुपेश ठक्कर (33) आणि पंकज भाई ओड (34) यांना अटक केली.
33 डेबिट कार्ड आणि चेकबुक जप्त
पोलिसांनी आरोपींकडून 33 डेबिट/क्रेडिट कार्ड, विविध बँकांची 32 चेकबुक, सहा मोबाईल फोन आणि 28 सिमकार्ड जप्त केले आहेत. या आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या: