एक्स्प्लोर

NTPC Green Energy आयपीओबाबत मोठी अपडेट समोर, महत्त्वाच्या माहितीने गुंतवणूकदारांना होणार फायदा!

NTPC Green Energy IPO : एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीचा आयपीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय आहे. या आयपीओबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

NTPC Green Energy IPO: सध्या एनटीपीसी (NTPC) ग्रीन एनर्जी आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. ही कंपनी स्वत:चा विस्तार करण्यासाठी कोट्यवधी रुपये जमवणार आहे. दरम्यान, हा आयपीओ आतापर्यंतचा रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील सर्वांत मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आयपीओबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे गुंतवणूकदारांना आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी पैशांचे नियोजन आतापासून करता येऊ शकते. 

कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज काय असेल?  

ब्लूमबर्गने याबाबत एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओबाबत एक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओची इश्यू प्राईज 100 रुपये (1.18 डॉलर) प्रति शेअर असण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनी आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 10000 कोटी रुपये उभे करणार आहे. आगामी 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.  या कंपनीने आयपीओसाठी किंमत पट्टा (प्राईस बँड) अद्याप निश्चित केलेला नाही. सध्या ही कंपनी त्यावर चर्चा करत आहे.  

कंपनी सर्व नवे शेअर्स जारी करणार

तत्पूर्वी भांडवली बाजार नियामक सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओला ऑक्टोबर महिन्यात मंजुरी दिलेली आहे. या कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये सेबीकडे आयपीओ आणण्यासाठी ड्रॉफ्ट पेपर दाखल केला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी पॉवर जनरेशन करणाऱ्या एनटीपीसी या कंपनीची उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एन10र्जीचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. म्हणजेच ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून सर्व फ्रेश शेअर्स जारी केली. गुंतवणूकदार आयपीओच्या माध्यमातून आपली हिस्सेदारी विकणार नाहीत. 

कंपनी 10 हजार कोटी रुपये कशासाठी वापरणार?

एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओतून मिळालेल्या 10,000 कोटी रुपयांपैकी 7500 कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम कार्यालयीन काम तसेच कंपनीचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओचे काही शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात आले आहेत. ही कंपनी आयपीओनंतर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजावर सूचिबद्ध होणार आहे. 

हेही वाचा :

Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचं दिवाळं, दोन दिवसात 12 लाख कोटी बुडाले

बँकेत नोकरी हवीय का? 1500 पदांसाठी भरती प्रकिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

Rupee Record Low:  डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, आता 1 डॉलर 84.23 रुपयांना 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget