NPS Investment : 15 जुलैपासून एनपीएसमध्ये बदल; गुंतवणूक करणे होणार सोपं
NPS Investment : एनपीएस गुंतवणूकदारांना पेन्शन फंडाच्या जोखीमबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपं जाणार आहे.
NPS Investment : 15 जुलैपासून 2022 पासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS)गुंतवणूक करणे सोपं होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्यावतीने (PFRDA) एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना NPS मध्ये रिस्क प्रोफाइलमध्ये माहिती देण्याबाबत नियम तयार करण्यात आले.
एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना स्वत: निर्णय घेण्यासाठी आणि अधिकाधिक चांगला परतावा मिळवण्यासाठी या नियमांचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. पेन्शन फंडला तिमाहीमध्ये 15 दिवसांच्या आत सर्व योजनांसाठी रिस्क प्रोफाइलला वेबसाइटवर शेअर करावे लागणार आहे. गुंतवणूकदारांना प्रोफाइलच्या जोखीमेबाबत माहिती देण्यासाठी नियम तयार करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, गुंतवणूक जोखीमबाबत सहा स्तर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये Low, Low to Moderate, Moderate, Moderately High, High आणि Very High असे स्तर तयार करण्यात आले आहेत. या जोखीम स्तराच्या आधारे पेन्शन फंडांचे तिमाही विश्लेषण करण्यात येईल. टियर-1 आणि आणि टियर-2. अॅसेट क्लास इक्विटी (ई), कॉर्पोरेट डेट (सी), शासकीय सिक्युरिटीज (जी) आणि स्कीम ए सारख्या पेन्शन फंड योजनांच्या जोखीम प्रोफाइलबाबत माहिती द्यावी लागणार आहे.
PFRDA च्या परिपत्रकानुसार, Conservative Credit Rating ही शून्य ते 12 पर्यंतची क्रेडिट रिस्क व्हॅल्यू दिली जाईल. 12 क्रेडिट व्हॅल्यू सर्वात कमी क्रेडिट मू्ल्य समजले जाते.
प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या 15 दिवसांच्या आत पोर्टफोलिओ डिस्क्लोजर सेक्शन अंतर्गत संबंधित पेन्शन फंडाच्या संकेतस्थळावर रिस्क प्रोफाइलची माहिती दिली जाईल. वर्षातून एकदा 31 मार्च रोजी रिस्क लेव्हल आणि एका वर्षात जितक्या वेळेस रिस्क लेव्हल बदलण्यात आली, त्याची माहिती पेशन्श फंडाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: