न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण! गैरव्यवहाराला हितेश मेहताच जबाबदार, बँकेचे माजी उपाध्यक्ष हिरेन भानू यांचे आरोप
New India Cooperative Bank fraud case : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक (New India Cooperative Bank fraud case ) गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
New India Cooperative Bank fraud case : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक (New India Cooperative Bank fraud case ) गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बँकेचे माजी उपाध्यक्ष हिरेन भानू (Hiren Bhanu) यांनी या गैरव्यवहाराला हितेश मेहताच जबाबदार असल्याचे आरोप केले आहेत. हा घोटाळा समोर आल्यानंतर हिरेन भानू परदेशात पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देताना भानू यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपण पत्नी ज्या बँकेच्या माजी अध्यक्षा गौरी भानू यासह मागील 30 वर्षापासून परदेशात रहात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अलिकडेच त्यांचा थायलंड दौराहाही पूर्वनियोजित असल्याचे EOW ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हिरेन भानूवर 26 कोटी रुपये घेतल्याचा आरोप
मुंबई पोलिसांच्या EOW विभागाला लिहिलेल्या पत्रात भानू यांनी या गैरव्यवहारानंतर आपल्याला फोन करुन पाच वर्षाच्या कालावधीतच हा गैरव्यवहार आपल्याकडून झाल्याचे कबूल केल्याचा दावा केला आहे. भानूवर अफरातफरीच्या रकमेतून 26 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यांची पत्नी गौरी भानूवर हितेश मेहता यांच्याकडून 2 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र भानू यांनी हे आरोप फेटाळून लावत ही बँक 4 वर्षापासून आरबीआयच्या देखरेखीखली होती असे म्हटले आहे. बँकेच्या बोर्डाच्या ऑडिट कमिटीमध्ये आरबीआयने नियुक्त केलेला एक संचालक देखील होता आणि तोच व्यक्ती न्यू इंडिया बँकेच्या बोर्डाचा भाग देखील होता. बँकेच्या धोरणानुसार बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकासह विविध विभागांसाठी सर्व बाह्य लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याची संपूर्ण जबाबदारी आहे.
आरबीआयचे अधिकारी बँकेत आले होते. त्यांनी बँकेच्या सर्व वरिष्ठ व्यवस्थापनांना बोर्ड रुममध्ये एकत्र येण्यास सांगितले आणि त्यावेळी मेहता देखील उपस्थित होते. त्यानंतर एका तासाने महता हे बँकेतून गायब झाले. त्यानंतर दुपारी आरबीआयचा मेल आल्यानंतर बँकेत 122 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. मेहता यांनी फोनवर नुसती गुन्ह्यांची कबूली दिली नाही तर आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याबाबतही फोनवर धमकावल्याचा आरोप भानू यांनी केला आहे. तसेच भानू यांनी दावा केला आहे की, त्यानेच मेहता यांना बँकेत परत जाण्यास आणि आरबीआय अधिकाऱ्यांसमोर त्यांच्या गुन्ह्यांची कबुली देण्यास समजावले. तसे न केल्यास बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची कोणतीही चूक नसताना शिक्षा होईल, वरील गोष्टी सिद्ध करण्यासाठी भानूने पोलिसांना सर्व कॉल लॉग दिले आहेत.
भानू यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची पडताळणी न करता कशी काय मेहताची ला डिटक्टर चाचणी करण्यात आली. तसेच बँक 2021 पासून आरबीआयच्या देखरेखीखाली असतानाही फसवणूक कशी दुर्लक्षित झाली, असा प्रश्नही भानू यानी आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागाला प्रश्न उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा, 25000 रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार























