एक्स्प्लोर

Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या

New Income Tax Rule : येत्या 1 एप्रिलपासून देशात नवीन आयकर नियम (Income Tax) लागू होणार असून PAN, ITR, HRA आणि मील बेनिफिट्समध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : देशात 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून (Government of India) लागू करण्यात येणारा हा नवीन आयकर नियम (Income Tax Act 2025) जवळपास 60 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे. सरकारच्या मते, हा केवळ करप्रणालीतील बदल नसून संपूर्ण कायदा अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न आहे.

सामान्य करदात्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे टॅक्स स्लॅब किंवा दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र रिपोर्टिंग, फाइलिंग आणि डिस्क्लोजरच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

Meal Benefits Rule Income Tax : मील कार्डवर मोठी करसवलत

नवीन नियमांनुसार, वेतनभोगी कर्मचाऱ्यांसाठी मील बेनिफिट्समध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मील कार्डवर किंवा व्हाऊचरवर (जसे Sodexo, Pluxee) 50 रुपयांपर्यंत करसवलत मिळत होती, ती आता 200 रुपये प्रति मील करण्यात आली आहे. यामुळे एका कर्मचाऱ्याला वर्षभरात सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतचा फायदा करमुक्त मिळू शकतो.

HRA Rules Change : एचआरए नियमांमध्ये मोठा बदल

हाऊस रेंट अलाउन्स (HRA) संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 50 टक्के HRA सूट मिळणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासोबत बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, फसवणूक टाळण्यासाठी घरमालकाची माहिती देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

Form 16 Update : आता Form 130 लागू

नवीन नियमानुसार कंपन्या आता कर्मचाऱ्यांना Form 16 देणार नाहीत. त्याऐवजी नवीन Form 130 जारी केला जाईल. यामुळे ITR फाइलिंग पूर्णपणे सिस्टिम-आधारित होणार असून TDS मध्ये त्रुटी असल्यास रिफंड उशिरा मिळण्याची शक्यता आहे. 

PAN Rules Strict : मोठ्या व्यवहारांसाठी PAN अनिवार्य

PAN कार्ड संदर्भातील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. वाहन खरेदी-विक्रीसारख्या मोठ्या व्यवहारांमध्ये PAN देणे आता बंधनकारक असेल. तसेच, टॅक्स रिजीम निवडण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून आता ITR फॉर्ममध्येच पर्याय निवडता येणार आहे.

Digital Tax System : अधिक पारदर्शक आणि सुलभ प्रणाली

नवीन आयकर कायद्याचा मुख्य उद्देश करप्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करणे हा आहे. फेसलेस असेसमेंट, कमी मानवी हस्तक्षेप आणि जलद रिफंड ही यामागची प्रमुख उद्दिष्टे आहेत. करदात्यांनी आपल्या HRA, PAN लिंकिंग, TDS आणि सॅलरी स्ट्रक्चरची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अडचणी टाळता येतील.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

RBI on UCB : नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं, पतसंस्थांचं बँकेत रुपांतर होण्यासाठी कोणते निकष?
मोठी बातमी, नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने मिळणार, आरबीआयनं 24 वर्षानंतर धोरण बदललं
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Embed widget