उद्यापासून 'हे' महत्वाचे बदल होणार, तुमच्या खिशावर ताण पडणार का?
2023-24 हे आर्थिक वर्ष (Financial Year) आज संपत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पैशासंदर्भात अनेक बदल (changes) होणार आहेत.
Financial Year : 2023-24 हे आर्थिक वर्ष (Financial Year) आज संपत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पैशासंदर्भात अनेक बदल (changes) होणार आहेत. या नवीन बदलांमध्ये गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ यासह अनेक बदल होणार आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
उद्यापासून NPS प्रणालीत होणार बदल
उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु (New Financial Year ) होत आहे. या नवीन वर्षात NPS म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत बदल होणार आहे. सध्याच्या पेन्शन प्रणालीच्या लॉगिन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. आता नवीन NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेश आवश्यक असणार आहे. NPS प्रणालीच्या सुरक्षेसाठी हा नियम करण्यात आलाय.
कर व्यवस्थेत बदल
उद्यापासून म्हणजे नवीन आर्थिक वर्षापासून नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनणार आहे. या अंतर्गत तुम्हाला आपोआप कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीत 7 लाख रुपयापर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयक भरावा लागणार नाही.
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. त्यासाठी आज शेवटचा दिव आहे. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन नंबर रद्द होणार आहे. यानंतर तुम्हाला कोणतेही बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळं आजचं आधार कार्डला पॅन लिंक करा
EPFO च्या नियमात झाले बदल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नवीन वर्षापासून नवीन नियम लागू केलेत. तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जना पीएफ ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे नोकरी सोडताना तुम्हाला पीएफ ट्रान्सफर करा हे सांगण्याची गरज पडणार नाही.
FASTag च्या नियमात बदल
नवीन आर्थिक वर्षात म्हणजे उद्यापासून फास्टॅगशी संबंधित एक मोठा बदल होणार आहे. जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल, तर तुम्हाला 1 एप्रिलपासून अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळं ही प्रक्रिया आजच पूर्ण करा.
SBI क्रेडिट कार्ड
SBI च्या क्रेडीट कार्ड नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून भाडे भरल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रिवॉर्ड पॉइंट मिळमार नाहीत.
महत्वाच्या बातम्या: