तुमच्या मुलीसाठी सर्वोत्तम योजना कोणती? म्युच्युअल फंड की सुकन्या समृद्धी योजना, अधिक फायदे कुठे मिळतो?
तुम्हालाही मुलगी असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. आजच्या काळात मुलींच्या नावे गुंतवणुकीसाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत.
National Girl Child Day : आज राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day)आहे. दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हालाही मुलगी असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. आजच्या काळात मुलींच्या नावे गुंतवणुकीसाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमच्या मुलीचे भविष्य घडवू शकता.
सरकारी योजनांसोबतच तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवू शकता. पण तुमच्या मुलीसाठी कोणती स्कीम सर्वोत्तम आहे याबद्दल तुम्ही गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवावेत. तुम्ही कुठे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे? पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
सुकन्या समृद्धी योजना
सध्या, सुकन्या समृद्धी योजना (SSY) 8.2 टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज सरकारकडून दर तिमाहीला मिळते. त्यात बदलही केले जात आहेत. सरकार या योजनांच्या व्याजाची त्रैमासिक आधारावर सुधारणा करते. तुम्ही ही सरकारी योजना फक्त 250 रुपयांपासून सुरू करू शकता. हे खाते मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत कधीही उघडता येते. यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना VS इक्विटी म्युच्युअल फंड
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक सरकारी योजना आणि निश्चित उत्पन्न सुविधा आहे. त्याच वेळी, म्युच्युअल फंड हे एक साधन आहे ज्याद्वारे आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. यामध्ये धोकाही आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत, म्हणजेच लॉकिन कालावधी होईपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तर, म्युच्युअल फंड हे तरल साधन आहे.
इक्विटी म्युच्युअल फंड
इक्विटी म्युच्युअल फंडांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना अतिशय आकर्षक परतावा दिला आहे. निप्पॉन इंडियाच्या व्हॅल्यू फंडाने 42.38 टक्के परतावा दिला आहे. याशिवाय आदित्य बिर्ला सन लाइफ प्युअर व्हॅल्यू फंडाने 42.02 टक्के परतावा दिला आहे. तर, ॲक्सिस व्हॅल्यू फंडाने 40.16 टक्के परतावा दिला आहे, तर SBI लाँग टर्म इक्विटी फंडाने 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
का साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन ?
मुलींना पाठिंबा देण्यासाठी भारतात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. तो दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. याद्वारे मुलींच्या हक्कांचा प्रचार करणे आणि मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: