search
×

Bikaji Foods IPO : बीकाजी फूड्स घेऊन येतोय एक हजार कोटींचा आयपीओ

Bikaji Foods IPO : पाणीपुरी, कचोरीसह चॅट आयटम्ससाठी प्रसिद्ध असलेलं बीकाजी फूड्स लवकरच शेअर बाजारातही आयपीओची डिश आणणार आहे.

FOLLOW US: 
Share:

Bikaji Foods IPO : पाणीपुरी, कचोरीसह चॅट आयटम्ससाठी प्रसिद्ध असलेलं बीकाजी फूड्स लवकरच शेअर बाजारातही आयपीओची डिश आणणार आहे. तब्बल एक हजार कोटींचा आयपीओ आणायची तयारी बीकाजीने केली असून यासाठी बाजार नियामक सेबीकडे ( SEBI)  ड्राफ्ट पेपर दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. 

 मिठाई आणि नमकीन तयार करणारी कंपनी बीकाजी फूड्स इंटरनॅशनल ( Bikaji Foods International) आपला आयपीओ घेऊन येत आहे. कंपनी यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे ( SEBI)  ड्राफ्ट पेपर ( Intial Public Offering) दाखल करणार आहे. या आयपीओ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जाण्याची शक्यता आहे. या आयपीओतून कंपनीला 7500 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. ( Draft Red Herring Prospectus) राजस्थानमधील बीकाजी फूड्स इंटरनॅशनल ( Bikaji Foods International) कंपनीने आयपीओ आणण्यासाठी  आयआयएफएल सिक्योरिटिजला बँकर म्हणून नियुक्त केले आहे. बीकाजी कंपनीचा आयपीओ सध्या गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल ( Offer For Sale) अंतर्ग विकला जाणार आहे.

खासगी इक्विटी कंपनी लाइटहाउस फंड्स, आयआयएफएल, एव्हेंडस आणि एक्सिसने बीकाजी फूड्स ( Bikaji Foods International) या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.  Bikaji Foods चे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स राजस्थान, असम, कर्नाटकमध्ये आहेत.  Bikaji Foods भुजिया, नमकीन, पापड, मिठाई याशिवाय फ्रोझन फूड्सही तयार करते. कंपनीचे प्रवर्तक शिव रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल यांच्याकडे 2020 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 78.8 टक्के भागिदारी होती. आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांमधून कंपनीचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. तसेत, या पैशातून नवीन प्रॉडक्ट्सही लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे.  2020 आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीचं उत्पन्न 1073 कोटी रुपये होतं. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये नमकीनची भागिदारी 37 टक्के इतकी आहे. तर भूजिया 32 टक्के, मिठाई 14 टक्के आणि पापड 10 टक्केंचा वाटा आहे. भारतामध्ये रेडी टू इट ( Ready To Eat) स्नॅक्स मार्केटमध्ये वेगाने विक्री होत आहे. 2021 ते 2025 यादरम्यान 8.9 टक्के विकासदर असण्याची शक्यता वर्त

Published at : 21 Feb 2022 07:06 PM (IST) Tags: IPO Bikaji Foods

आणखी महत्वाच्या बातम्या

नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज

नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज

Investment Tips : दोन वेळचा चहा सोडून द्या आणि करोडपती व्हा! जाणून घ्या कसं?

Investment Tips : दोन वेळचा चहा सोडून द्या आणि करोडपती व्हा! जाणून घ्या कसं?

May 2023 New Rule: LPG सिलेंडर स्वस्त, GST च्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम

May 2023 New Rule: LPG सिलेंडर स्वस्त, GST च्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

Mumbai Crime News : मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा

Mumbai Crime News : मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा

टॉप न्यूज़

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक