Mutual Fund : या वर्षी 'या' सर्वोत्तम एसआयपी निवडा, पाच वर्षांत बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळवा
बँक एफडी हा गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय असला तरी मिळाणाऱ्या कमी परताव्यामुळे त्याची लोकप्रियता कमी होत आहे.
Best SIP for 5 Years Investment 2022: बँक एफडी हा गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय असला तरी मिळाणाऱ्या कमी परताव्यामुळे त्याची लोकप्रियता कमी होत आहे. चलनवाढीशी तुलना केल्यास परतावा मायनस मध्ये जाण्याची शक्यता असते. अशा स्थितीत, गुंतवणूकदार त्यांच्या उद्दिष्टांवर आणि जोखमीच्या क्षमतेवर आधारित एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होत असून गेल्या काही दिवसांमध्ये मुच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे.
बाजाराशी संबंधित जोखीम घेऊ शकणारे गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडाला पसंती देत आहेत, जे जास्त जोखीम घेऊ शकत नाहीत अशा गुंतवणूकदारांमध्ये डेट म्युच्युअल फंड लोकप्रिय झाले आहेत. इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडाच्या काही SIP खाली दिल्या आहेत जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये फंड प्रकार, जोखीम पातळी, NAV (नेट अॅसेट व्हॅल्यू) आणि अपेक्षित परतावा यानुसार उत्तम परतावा देऊ शकतात.
इक्विटी फंडात 5 वर्षांसाठी सर्वोत्तम एसआयपी
Axis Bluechip Fund Monthly SIP : ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे ज्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि दीर्घ कालावधीत प्रचंड भांडवल निर्माण करण्याची उत्तम योजना आहे. या अंतर्गत पैसे प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांच्या लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवले जातात. उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी 10 हजार रुपयांची एसआयपी केली तर तुम्ही 6 लाख रुपये गुंतवाल जे 5 वर्षांत 7.24 लाख रुपये होतील.
ICICI Prudential Bluechip Fund : ही एक ओपन-एंडेड योजना आहे ज्याचे पैसे लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवले जातात. आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार, यामध्ये 10 हजार रुपयांची एसआयपी 5 वर्षांत 6.29 लाख रुपये होऊ शकते.
SBI Bluechip Fund : या फंडाचे पैसे इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवले जातात जे दीर्घकालीन भांडवल उभारणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या योजनेंतर्गत बाजाराच्या स्थितीनुसार 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक भांडवलासह 5 वर्षांत 6.3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक भांडवल केले जाऊ शकते.
Mirae Asset Large Cap Fund : हा फंड एप्रिल 2008 मध्ये लाँच करण्यात आला आणि यामध्ये एका वर्षानंतर पैसे काढण्यासाठी एक्झिट लोड नाही. त्याचे पैसे इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवले जातात. लार्ज कॅप फंड म्हणून या फंडातील 71.54 टक्के लार्ज कॅप फंडांमध्ये, 13.15 टक्के मिडकॅपमध्ये आणि 3.62 टक्के स्मॉल-कॅप समभागांमध्ये गुंतवले जातात. या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांच्या 5 वर्षांच्या SIP मधून 6.72 लाख रुपयांचे भांडवल तयार केले जाऊ शकते.
SBI Multicap Fund : जर तुम्ही या योजनेत दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर आतापर्यंतच्या परताव्यानुसार ५ वर्षांच्या शेवटी ६.६९ लाख रुपयांचे भांडवल तयार केले जाऊ शकते. त्याचे पैसे इक्विटी आणि कर्ज साधनांमध्ये गुंतवले जातात.
5 वर्षांसाठी डेट फंडातील सर्वोत्तम एसआयपी
HDFC Short Term Debt Fund : हा अल्प-मुदतीचा फंड आणि मध्यम कमी जोखीम असलेला डेट म्युच्युअल फंड आहे. यामध्ये दरमहा गुंतवलेले दहा हजार रुपये पाच वर्षांत ७.४ लाख रुपये होऊ शकतात म्हणजेच ६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १.४ लाख रुपयांचा नफा. या फंडात प्रवेश आणि एक्झिट लोड नाही.
Aditya Birla Sun Life Savings Fund : हा देखील पाच वर्षांसाठी एक उत्कृष्ट एसआयपी आहे आणि कमी कालावधीत चांगला नफा मिळवता येतो. बँक एफडीपेक्षा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही यामध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षांत तुम्ही 6.81 लाख रुपयांचे भांडवल करू शकता. यातील ९३.८ टक्के रक्कम डेट फंडात गुंतवली जाते.
SBI Magnum Medium Duration Fund : हा एक मीडियम ड्यूरेशन फंड आहे आणि त्याचे पैसे डेट फंड, सरकारी रोखे आणि अत्यंत कमी जोखीम असलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. जो जास्त जोखीम घेऊ शकत नाही अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय असू शकतो.
Nippon India Low Duration Fund : हा एक ओपन-एंडेड डेट म्युच्युअल फंड आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी माफक प्रमाणात कमी आहे आणि अशा गुंतवणूकदारांसाठी जे अल्पावधीत आपले भांडवल वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. या फंडाचा पैसा मनी मार्केट सिक्युरिटीज आणि डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवला जातो.
L&T Low Duration Fund : हा एक ओपन शॉर्ट-ड्यूरेशन फंड आहे जो इष्टतम परताव्यासाठी ओळखला जातो. ही योजना रिलायन्स म्युच्युअल फंडाने 2007 मध्ये सुरू केली होती आणि या अंतर्गत तुम्ही दरमहा 10 हजार रुपयांची एसआयपी केल्यास पाच वर्षांत तुमचे पैसे 7.29 लाख रुपये होऊ शकतात.
(स्रोत: पॉलिसी बझार)
(डिस्क्लेमर: वरील बातमीत दिलेला अंदाजित परतावा हा फंडाच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डवर आधारित आहे आणि भविष्यात तो परफॉर्म करण्याची गरज नाही. एसआयपीमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
आयडिया-वोडाफोनमधली म्युच्युअल फंडची गुंतवणूक धोक्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha