एक्स्प्लोर

आयडिया-वोडाफोनमधली म्युच्युअल फंडची गुंतवणूक धोक्यात

वोडाफोन-आयडिया कंपन्यांमधील म्युच्युअल फंडची गुंतवणूक सध्या धोक्यात आहे. त्यामुळे वोडाफोन-आयडियाच्या कर्जबाजारीपणाचा फटका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मध्यमवर्गीयांना बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : तुम्ही जर म्युच्यअल फंडमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रातील आयडिया आणि वोडाफोन या कंपन्यांमधली म्युच्युअल फंडची गुंतवणूक धोक्यात आहे. या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडाद्वारे पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना ही गुंतवणूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात आपले हात-पाय पसरले तसं इतर कंपन्यांचं धाबं दणाणलं. स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान आणि तुलनेनं कमी होत जाणारा नफा या दोन्हींशी दोन हात करत असतांनाच सर्वोच्च न्यायालयाचा दणका आयडिया आणि व्होडाफोनला बसला. सर्वोच्च न्यायालयाने या कंपन्यांचा सरकारच्या दूरसंचार विभागाकडे थकित असलेला सामायोजित सकल महसूल म्हणजेच एजीआर तातडीने भरायचे निर्देश दिले. एजीआर म्हणजे नेमकं काय? एजीआर म्हणजे अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू. मराठीत, समायोजित सकल महसूल... एजीआर म्हणजे दूरसंचार मंत्रालयाच्या विभागाकडून (DoT) टेलिकॉम कंपनीकडून युजेज आणि लायसन्स फी आहे. याचे दोन भाग असतात. स्पेक्ट्रम युजेज चार्ज आणि लायसन्स फी हे अनुक्रमे 3-5 टक्के आणि 8 टक्के असते. सुप्रीम कोर्टाचा दणका वोडाफोन, आयडिया आणि टाटा टेलिसर्विस कंपन्यांनी समायोजित सकल महसूल (AGR) जमा करण्यास विलंब केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दूरसंचार विभागाकडे तब्बल 50 हजार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. जर पैसे भरले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DoT) सांगितलं. एजीआर महसूल भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी एअरटेल, आयडिया, वोडाफोन आणि टाटा टेलिसर्व्हिसने सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत कारणे दाखवा नोटीस जारी केली. यावेळी सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबर 2019 रोजी सरकारच्या मागणीला योग्य ठरवत टेलिकॉम कंपन्यांना 23 जानेवारी 2020 रोजीपर्यंत वेळ दिली होती. या तारखेपर्यंत रिलायन्स जिओने पैसे भरले पण इतर कंपन्यांनी पैसे भरले नाहीत. यावरुन कंपन्यांना पैसे भरण्याच्या वेळेत वाढ करावी यासाठी कोर्टात गेल्या होत्या. म्युच्युअल फंड कंपन्यांचेही हात दगडाखाली टेलिकॉम कंपन्यांवर टांगती तलवार आहे. एकीकडे 50 हजार कोटी महसूल थकलेला असताना, म्युच्युअल फंड कंपन्यांनी देखील हात आखडता घेतला. वोडाफोन आणि आयडियामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमांसाठी म्युच्युअल फंड कंपन्यांनी आता वेगळे सेग्रीगेट पोर्टफोलिओ तयार केले आहेत. ज्यामधून गुंतवणूकदार पुढच्या काही काळासाठी तरी आपले पैसे काढून घेऊ शकणार नाहीत. म्हणजेच, नुकसानीत जाणारा गुंतवणुकीचा वाटा एकंदर गुंतवणुकीपासून वेगळा काढला आहे. यात, अर्थातच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे आहेत. सेग्रीगेटेट पोर्टफोलिओ तयार झाल्याने ही गुंतवणूक काही कालावधीसाठी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कंपन्यांकडे परत मागता येणार नाही. त्यामुळे या सेग्रीगेटेट पोर्टफोलिओमध्ये आता हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकून पडले आहेत. जरी, ही गुंतवणूक काढून घेतली तरी गुंतवणूकदारांच्या हातात प्रचंड तोट्याशिवाय सध्यातरी काहीही येणार नाही. तज्ज्ञांचं म्हणणं काय? फायनान्स एक्सपर्ट, सिद्धार्थ कुवावाला सांगतात की, "सरकार टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसाठी काही ना काही मार्ग काढेल. या कंपन्यांवरचा एजीआरचा बोजा कमी झाला तर म्युच्युअल फंड गुंतवणूकही फायद्यात येईल आणि गुंतवणूकदारांना किमान परतावा मिळू शकेल." मार्केट तज्ज्ञ ए.पी शुक्ला यांच्या मते, "गुंतवणूकदारांनी सध्या धीर धरणे हा एकमेव उपाय आहे. तोटा बघून लगेच म्युच्युअल फंड कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेतली तर मोठाच तोटा होईल. मात्र, सॅग्रीगेट पोर्टफोलिओ तयार झाला असल्याने जरी पैसे अडकून पडले असले तरी त्यात मोठा तोटा सहन करावा लागणार नाही" त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आता संयम ठेऊन वाट बघणं किंवा मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरं जाणं यांपैकी एक पर्याय त्यांना निवडावा लागेल. खरंतर दूरसंचार क्षेत्र हे कायमच मोठी मागणी असणारं आणि मोठी उलाढाल असणारं क्षेत्र. या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे बुडणार नाहीत हा गुंतवणूकदारांना विश्वास असतो. मात्र, आता याच क्षेत्रातल्या दोन मोठ्या कंपन्यांचा पाय खोलात आहे आणि त्यापाठोपाठ हजारो-लाखोंच्या संख्येने असणाऱ्या गुंतवणूकदारांचं भवितव्यही टांगणीला लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget