एक्स्प्लोर

30 हजार रुपये गुंतवा अन् व्हा 5 कोटींचे मालक, जाणून घ्या करोडपती बनवणारा SIP चा 'हा' फॉर्म्यूला!

म्यूच्यूअल फंडात अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. यात शेअर बाजाराच्या तुलनेत कमी जोखमी असते.

मुंबई : आपल्याजवळ असलेल्या पैशांपासून आणखी काही पैसे कमवावेत यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. गेल्या काही दिवसांपासून एसआयपीच्या (SIP) माध्यमातील गुंतवणुकीला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे थोडा अभ्यास करून नियमितपणे एसआयपीएमध्ये पैसे गुंतवल्यास कोट्यधीश होण्याचीही संधी आहे. याच पार्श्वभूमीवर एसआयपीएच्या माध्यमातून कोट्यधीश कसे होता येईल हे जाणून घेऊ या...

19 वर्षांच्या गुंतवणुकीवर होता येईल कोट्यधीश

प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपयांची एसआयपी करून तुम्हाला कोट्यधीश होता येते. सलग 19 वर्षे अशा प्रकारची गुंतवणूक केल्यास तुम्हाला थेट पाच कोटी रुपयांचा एकूण निधी मिळवता येऊ शकेल. एसआयपी अनेक अर्थांनी वेगळी आहे. कारण यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तसेच या गुंतवणुकीत कंपाऊंडिंगचाही लाभ मिळतो. चांगला परतावा तसेच कंपाऊंडिंगचा फायदा यामुळे जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला एकगठ्ठा मोठी रक्कम मिळते. 

म्यूच्यूअल फंडमध्ये जोखीम कमी

तसं पाहायचं झालं तर शेअर बाजार आणि म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी यामध्ये जोखीम आहे, हे समजून घेतले पाहिजे. कारण बाजारातील चढ-उतारामुळे शेअर बाजार आणि म्यूच्यूअल फंडामध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला कधी नुकसानही होऊ शकते. मात्र शेअर बाजाराच्या तुलनेत म्यूच्यूअल फंड हे कमी जोखमीचे म्हटले जाते. म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवलेल्या रकमेतून आपल्याला साधारण 10 ते 15 टक्के परतावा मिळतोच. किंवा कधीकधी यापेक्षाही अधिक परतावा मिळू शकतो. जास्त अवधीसाठी (लाँग टर्म) तुम्ही एसआयपी केल्यास हाच परतावा  18 ते 20 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. 

30 हजार रुपये गुंतवल्यास तुम्ही कोट्यधीश कसे होणार?

एसआयपीच्या माध्यमातून प्रतिमहा तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही थेट कोट्यधीश बनू शकता. समजा तुम्ही प्रतिमहा एखाद्या फंडामध्ये 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आणि याच गुंतवणुकीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांचा वाढ केल्यास 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने तुम्हाला 19 वर्षांत थेट पाच कोटी रुपये मिळतील.   

फक्त दहा वर्षांत जमा होणार एक कोटी रुपये

प्रतिमहा तीस हजार रुपयांची एसआयपी आणि या रकमेत प्रतिवर्ष 10 टक्क्यांची वाढ, असे सूत्र वापरल्यास तुमचे अवध्या तीन वर्षांत 50 लाख रुपये जमा होतील. पुढे असेच सूत्र कामय ठेवल्यास 12 टक्के परताव्याच्या दराने 10 वर्षांत तुम्हाला एक कोटी रुपये परतावा मिळेल. 19 वर्षांपर्यंत ही रक्कम पाच कोटी रुपये होईल. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपयांची एसआयपी केली. पण दरवर्षी या गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी वाढ नाही केली, तर 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने पाच कोटी रुपये मिळण्यासाठी 24 वर्ष लागतील. 

(टीप- फक्त माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.) 

हेही वाचा :

भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget