एक्स्प्लोर

भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ

भारतासाठी (India) एक दिलासादायक बातमी आहे. देशाच्या व्यापारात (India Trade) मोठी वाढ झालीय. भारताची सेवा निर्यात (service exports) 11 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

India Export News : भारतासाठी (India) एक दिलासादायक बातमी आहे. देशाच्या व्यापारात (India Trade) मोठी वाढ झालीय. भारताची सेवा निर्यात (service exports) 11 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. भारताची ही फायद्याची गोष्ट आहे, तर आपला प्रतिस्पर्धी चीनला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या सेवा निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 

 2023 मध्ये भारताची सेवा निर्यात 11.4 टक्क्यांनी वाढली service exports 

भारतासमोर मोठ्या प्रमाणात जागतिक आव्हानं आहेत. ही आव्हानं पेलून भारताने निर्यातीत मोठी वाढ केलीय. 2023 या वर्षात निर्यातीत मोठी वाढ झालीय. 2023 मध्ये भारताची सेवा निर्यात 11.4 टक्क्यांनी वाढलीय. दरम्यान एका बाजूला भारताची सेवा निर्यात वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला चीनची सेवा निर्यात कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चीनची सेवा निर्यात 2023 मध्ये 10.1 टक्क्यांनी घसरली आहे. चीनची निर्यात ही 381 अब्ज डॉलर झाली आहे.

स्मार्टफोन उत्पादनातही भारत आघाडीवर 

दिवसेंदिवस भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या गुंतवणूक (Investment) करत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर अनेक बड्या कंपन्यांनी चीनमधील (china) गुंतवणूक कमी केली आहे. त्यामुळं भारतीय बाजारेपेठेला फायदा होतोय. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचे (smartphone) उत्पादन केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ॲपलपासून ते टेस्लापर्यंतच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचा मोठा फायदा होतोय. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून परदेशात 12.1 अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा आयफोनचा (iphone export) आहे.  मागील वर्षीच्या तलनेत ही वाढ मोठी आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात आफोनचं उत्पादन

सध्या आयफोनला मोठी मागणी आहे. भारतात मोठ्या प्रमाणात आफोनचं उत्पादन केलं जातं. त्यामुळं वाढत्या मागणीला भारतातून योग्य प्रमाणात पुरवठा होत आहे. येणाऱ्या काळात आणखी आयफोन संदर्भातील व्यवसाय वाढवण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आयफोनला असणारी मागणी लक्षात घेता उत्पादनात मोठी वाढ झालीय. त्यामुळं निर्यातीत देखील वाढ होत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयफोनच्या निर्मितीत 100 टक्यांची वाढ झालीय. आयफोनच्या जागतिक पुरवठा साखळीत भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत भारतीय बनावटीच्या आयफोनला मोठी मागणी आहे.  

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! केळी-आंब्यासह 'या' 20 पिकांची निर्यात वाढणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार का? 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Ladaki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या किती? आदिती तटकरेंनी आकडेवारी सांगितली, बीडच्या लाभार्थी संख्येवर स्पष्टीकरण
92 लाख अपात्र महिलांच्या संख्येवर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया, मूळ नोंदणी ते प्रत्यक्ष लाभार्थी संख्या सांगत म्हणाल्या
Gold- Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget