एक्स्प्लोर

मोहरीसह हरभरा महागला, तर मसूरच्या दरात घसरण, नेमकी काय आहे परिस्थिती?

सध्या मोहरी (Mustard) आणि हरभऱ्यांच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. तर काही वस्तूंच्या दरात घसरण देखील होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

Mustard Price : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली असून आणखी एका टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. दरम्यान, या काळात कोणत्याबी वस्तूंच्या दरात वाढ होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, काही वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या मोहरी (Mustard) आणि हरभऱ्यांच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. तर काही वस्तूंच्या दरात घसरण देखील होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

दरम्यान, कोणतीही वस्तू जर महाग झाली तर त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांच्या खिशावर होतो. याबद्दल बोलायचे झाले तर अनेक वस्तूंच्या किंमती बाजारात चढ्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचा खिसा मोकळा झाला आहे. गेल्या काही काळापासून कांद्याने सर्वसामान्यांना रडवले होते. त्यामुळे सरकारला निर्यातीवर बंदी घालावी लागली आहे. सध्या मोहरी आणि हरभऱ्याच्या दरात वाढ होत आहे.

मोहरीचे दरात 600 ते 700 रुपयांची वाढ

मोहरीच्या दरात वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या मोहरी आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजारातील मोहरीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजारातील मोहरीचे भाव सुमारे 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. तेल गिरण्यांकडून मोहरीच्या वाढत्या मागणीमुळे मोहरीचे भाव वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

हरभऱ्याच्या दरातही वाढ कारण...

एका बाजूला मोहरीचे दर वाढत असताना दुसऱ्या बाजूला हरभऱ्याच्या दरातही वाढ होतेय. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये यंदा हरभरा पिकात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं हरभऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या  हरभरा 6300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. त्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुगाच्या किमतीत घट

एका बाजुला काही वस्तूंच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजुला काही वस्तूंच्या दरात घट होताना दिसत आहे. सध्या मूग डाळीच्या दरात घसरण होत आहे. मूग डाळीचे दर 8050 हे प्रतिक्विंटल 8150 रुपये प्रतिक्विंटल होते. मोठ्या घसरणीनंतर तो आता 7000 रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुगाच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

देशात अन्नधान्य, इंधन, वीज महागले, घाऊक महागाई दरात वाढ!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget