एक्स्प्लोर

CNG Price News : महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात

CNG Price News : महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या गॅस दरात मोठी कपात केली आहे.

CNG Price News : महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात (CNG Price ) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas) याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत.

मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक किलो सीएनजीसाठी आता अडीच रुपये कमी मोजावे लागणार. आज मध्यरात्रीपासून नवीन किंमती नुसार 87 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे. 

मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  

सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, सीएनजी वाहनांच्या वापरामुळे ग्राहकांची पेट्रोल-डिझेलच्या तुलनेन खर्चात जास्त बचत होत नाही. सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसा फरक राहिला नव्हता. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्याच्या परिणामी चालू आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर कमी झाला असल्याचे समोर आले होते.  

नोव्हेंबर महिन्यात झाली होती दरवाढ 

महानगर गॅस लिमिटेडने नोव्हेंबर महिन्यात सीएनजी गॅस दरवाढ केली होती. सीएनजीच्या दरात प्रति किलो 3.50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर, घरगुती वापरासाठी पीएनजीच्या (PNG) दरात दीड रूपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा दर 89.50 रुपये प्रति किलो इतका झाला. तर, घरगुती पीएनजीचा दर 54 रुपये प्रति एससीएम झाला होता.  

सीएनजी वाहनाच्या वापरात घट 

रेटिंग एजेंसी इक्रा (ICRA) एजन्सीच्या रिपोर्टनुसार, नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सीएनजी वाहनाच्या वापरात घट झाली. , जागतिक स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यामुळे गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे डिझेल आणि सीएनजीमधील किंमतीतील तफावत खूपच कमी झाल्याने दोन्हीचे दर सरासरी समान आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनांचा पर्याय टाळत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget